Chhota Gandharva| संगीत रंगभूमीतील मधुर आवाजाची देणगी लाभलेला कवीमनाचा तारा ‘छोटा गंधर्व’

| Updated on: Dec 31, 2021 | 7:00 AM

नैसर्गिक आवाजाची देणगी लाभलेल्या सौदागर यांची गाणे अधिक बहारदार व्हावी. त्यांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळावी यासाठी दामूअण्णांनी प्रयत्न केलं . वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा यांच्याकडून त्यांना गायनाचे आरंभीचे धडे मिळाले.

Chhota Gandharva| संगीत रंगभूमीतील मधुर आवाजाची देणगी लाभलेला कवीमनाचा तारा छोटा गंधर्व
Chhota Gandharva
Follow us on

पुणे – संगीत रंगभूमीतील चार महत्वाच्या गंधर्वांपैकी एक म्हणजे छोटा गंधर्व होय. गोड आवाजाची निसर्गदत्त देणगी लाभलेल्या छोटा गंधर्व यांचे मूळ नाव सौदागर नागनाथ गोरे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भाडळे हे त्याचे जन्म गाव होय. 10 मार्च 1918 त्याचे जन्म झाला.  कविमनाच्या या छोट्या गंधर्वला गोड गळ्याची पहिली ओळख बालमोहन संगीत मंडळीचे मालक दामूअण्णा जोशी यांना झाली. बाळा सौदागरच्या आई-वडिलांची समजूत घालत दामूअण्णा जोशीनी सौदागर व त्याचाच भाऊ पितांबर यालाबालनटांची नाट्यसंसंस्थेत आणले.

प्रेक्षकांची जिंकली मने
वयाने लहान असलेल्या सौदागारने रंगभूमीवरील आणलेल्या प्राणप्रतिष्ठा ह्या पहिल्याच नाटकात नायिकेची भूमिका मिळवली. इतकंच नव्हे तर आपल्या सुमधूर आवाजानं या नाटकात प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बालमोहन’च्या अन्य काही नाटकांत कामे केल्यानंतर, ह्या संस्थेने सादर केलेल्या संशयकल्लोळ ह्या नाटकातल्या नायिकेची-रेवतीची त्यांनी केलेली भूमिका अतिशय गाजली. त्यांनी गायलेल्या अनेक पदांना प्रेक्षकांकडून ‘वन्स मोअर’ मिळत.

पुढं ‘माझ्या आवाजाला शोभेल असं स्वत:चं गाणं मी बनवलंय. मी रंगभूमीवर कुणाचीही नक्कल करीत नाही. आय कान्ट इमिटेट एनी बडी बट आय फॉलो बालगंधर्व. माझं गाणं माझ्या चिंतनातून आलं आहे,’ असं सांगणारा आध्यात्मिक प्रवृत्तीचा, कविमनाचा, प्रसिद्धीपासून दूर असलेला आणि साधी राहणी असलेला अत्यंत मोठा कलाकार म्हणजे छोटा गंधर्व म्हणून नावारूपाला आला.

यांच्याकडील शिक्षणातून गायकी अधिक कंगोरे पडले

नैसर्गिक आवाजाची देणगी लाभलेल्या सौदागर यांची गाणे अधिक बहारदार व्हावी. त्यांना उत्तमोत्तम गायकांची तालीम मिळावी यासाठी दामूअण्णांनी प्रयत्न केलं . वसंतराव गोइत्रीकर, दत्तुबुवा बागलकोटकर, नरहरबुवा पाटणकर, धुळे येथील गायनशिक्षक पाध्येबुवा यांच्याकडून त्यांना गायनाचे आरंभीचे धडे मिळाले. कृष्णराव गोरे, कृष्णराव शेंडे, दीनानाथ ह्यांचाही काही सहवास व मार्गदर्शन मिळाले. इतकंच नव्हेतर ग्वाल्हेर घराण्याचे गायक सेंदेखाँ ह्यांचा गंडा बांधून सौदागर त्यांच्याकडे शिकू लागले. यातूनचा त्यांची गायकी बहरत गेली. पुढे या सगळ्या शिक्षणातून त्याचे स्वतःच्या गायकीचा रसायन त्याना घडवता आले.

आचार्य अत्रेंनी अशी केली मदत

1932-33 च्या दरम्यान नाटकाच्या व्यवसायाला उतरती कळा लागल्यानंतर त्याची झाला ‘बालमोहन संगीत मंडळी’लाही बसू लागली. याच काळात आचार्य अत्रे या मंडळींच्या मागे उभे राहिले. त्यावाईट काळातून त्यांना बाहेर काढले. यावरच ना थांबता अत्र्यांचे पहिले नाटक साष्टांग नमस्कार ‘बालमोहन’ने 1933  साली रंगभूमीवर आणले. त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ह्या नाटकात सौदागरांनी नायिकेची-त्रिपुरीची भूमिका खूप गाजली. त्यानंतर साष्टांग नमस्कार आणि घराबाहेर नंतर भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, उद्याचा संसार, वंदे मातरम्, मी उभा आहे अशी नाटके ‘बालमोहन’ने रंगभूमीवर आणली. त्यात सौदागर यांनी नायिकेची नव्हे तर नायकाची भूमिका केल्या व त्या प्रचंड गाजल्या .

अशी मिळाली स्वरराज छोटा गंधर्व’ पदवी
नाट्यसंगीतासाठी शास्त्रीय संगीताची बैठक आवश्यक असून संगीतातील सर्व प्रकारचे सौंदर्य नेमकेपणाने टिपता आले पाहिजे; नाटकातील पदाचा आरंभ आणि त्याची अखेर आकर्षक असली पाहिजे; नाट्यसंगीतासाठी क्लिष्ट रागांची योजना करू नये; प्रेक्षकांच्या अंतःकरणापर्यंत सहजपणे भिडतील अशा संगीतरचना कराव्या असे त्यांचे म्हणणे असत. आपल्या असामान्यगान कौशल्यामुळे प्रसिद्धीस आलेल्या सौदागर यांना समाज सुधारक अंनत हरी गद्रे यांनी मधुर गळ्याच्या सौदागरला ‘छोटा गंधर्व’ हा किताब बहाल केला. निर्भीड या वृत्तपत्रात त्यांचा सर्वप्रथम छोटा गंधर्व असा उल्लेख केल्याचे आढळते. विद्याधर गोखले ह्यांच्या सुवर्णतुला ह्या नाटकात त्यांनी काम केले होते. आणि त्यातील पदांना संगीतही दिले होते.

त्यांनी1937 साली इंदू मुळपुळे ह्यांच्याशी विवाह केला. आवाज खराब असेल तर थेट नाट्यप्रयोग रद्द करणाऱ्या या अवलियाने आपला उतारवयातला आवाज प्रेक्षकांना ऐकू नये असे वाटत होते. म्हणूनच 1978 मध्ये स्वरवैभवाच्या शिखरावर असताना, छोटा गंधर्व यांनी नाट्यसंन्यास स्वीकारला. मुंबईत 1980 साली झालेल्या साठाव्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना देण्यात आला होता. छोटा गंधर्व यांचे 31 डिसेंबर 1997 रोजी निधन झाले.

कचऱ्याला सोन्याचं मोल: रेल्वेचा स्क्रॅप विक्रीतून कमाईचा उच्चांक, उत्तर विभागाला 400 कोटी!

Special Report | राज्यातल्या अनेक नेते मंडळींना कोरोनाची लागण

ई-कॉमर्स धोरण: अॅमेझॉन ते ओला-उबरसाठी नवे नियम, मसूदा अंतिम टप्प्यात