कचऱ्याला सोन्याचं मोल: रेल्वेचा स्क्रॅप विक्रीतून कमाईचा उच्चांक, उत्तर विभागाला 400 कोटी!

कचऱ्याला सोन्याचं मोल: रेल्वेचा स्क्रॅप विक्रीतून कमाईचा उच्चांक, उत्तर विभागाला 400 कोटी!
भारतीय रेल्वे

उत्तर रेल्वेचे जनरल मॕनेजर आशुतोष गांगल यांनी स्क्रॕप विक्री एक महत्वपूर्ण कार्यवाही असल्याचे म्हटले आहे. स्क्रॕपद्वारे रेल्वेला आर्थिक उत्पन्नासोबत रेल्वे परिसर स्वच्छता ठेवण्यास सहाय्य मिळते. रेल्वे रुळाच्या नजीक लोखंडी तुकडे, टाईल्स इ. साहित्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 30, 2021 | 10:52 PM

नवी दिल्ली– भारतीय रेल्वेनं कचऱ्याचं सोनं केलं आहे. रेल्वेच्या उत्तर विभागाने स्क्रॅपपच्या विक्रीतून कमाईचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. स्क्रॅप विक्रीतून 402.51 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. मागील वित्तीय वर्षामध्ये कमाई केलेल्या 208.12 कोटी विक्रीपेक्षा 93.40 टक्के अधिक आहे. उत्तर रेल्वेने सप्टेंबर 2021 मध्ये 200 कोटी, ऑक्टोबर मध्ये 300 कोटी आणि डिसेंबर मध्ये 400 कोटींच्या स्क्रॅप विक्रीचा टप्पा पार केला आहे. भारतातील सर्व क्षेत्रीय रेल्वे आणि उत्पादन विभागांत सर्वोच्च व्यवहार ठरला आहे. उत्तर रेल्वेचे जनरल मॅनेजर आशुतोष गांगल यांनी स्क्रॅप विक्री एक महत्वपूर्ण कार्यवाही असल्याचे म्हटले आहे. स्क्रॅपद्वारे रेल्वेला आर्थिक उत्पन्नासोबत रेल्वे परिसर स्वच्छता ठेवण्यास सहाय्य मिळते. रेल्वे रुळाच्या नजीक लोखंडी तुकडे, टाईल्स इ. साहित्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो. पाण्याच्या टाकी, वापरात नसलेल्या केबिन, क्वार्टर आणि साधनांचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्क्रॅप विल्हेवाट लावण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. रेल्वेच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रक्रियेचे संनियंत्रण केले जाते.

उत्तर रेल्वेकडे सर्वाधिक ‘स्क्रॅप’!

उत्तर रेल्वेकडे मोठ्या प्रमाणात स्क्रॅप आहे. उत्तर रेल्वेने उत्पन्नासोबत स्क्रॅपखालील मोठी जमीन वापरासाठी उपलब्ध करणे रेल्वेचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे. उत्तर रेल्वेने ‘झिरो स्क्रॅप’ ध्येय साध्यतेसाठी आणि वित्तीय वर्षात सर्वाधिक स्क्रॅप विक्रीचा उच्चांक निर्माण करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. स्क्रॕपद्वारे प्राप्त उत्पन्नातून प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विस्तीर्ण रेल्वे नेटवर्क:

व्यवस्थापनासाठी भारतीय रेल्वेचे १८ विभाग करण्यात आले आहेत. प्रत्येक रेल्वे विभागाचे देखील प्रभाग पाडण्यात आले आहेत. प्रत्येक प्रभागात एक प्रभागीय कार्यालय असते. असे एकूण ६७ प्रभाग आहेत. कोलकाता मेट्रोचे मालकी हक्क व संचालन भारतीय रेल्वेकडे असले तरी देखील ही मेट्रो सेवा कोणत्याही प्रभागामध्ये येत नाही. संचालनाच्या दृष्टीने या रेल्वेस विभागीय रेल्वेचा दर्जा आहे. रेल्वेच्या उत्तर विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

वर्ष 2022: नियोजन हेच धोरण, तुमच्या प्रभावी ‘अर्थ’संकल्पासाठी ‘6’ मंत्र!

Kalicharan Maharaj : कालीचरण बाबाला दोन दिवसांची पोलीस कोठडी, गांधींजींबाबत संतापजनक विधान भोवलं

नववर्षाच्या जल्लोषाला दहशतवादी हल्ल्याचं सावट, रेल्वे पोलीस आयुक्तांनी जारी केला अलर्ट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें