Mumbai Civic Elections: मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना दुहेरी टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास अवघा एक दिवस शिल्लक असताना, शहरात चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपच्या महायुतीसह, ठाकरे गट-मनसे-राष्ट्रवादीची युती, काँग्रेस-वंचित आघाडी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्वतंत्र गट असे प्रमुख पक्ष मैदानात उतरले आहेत. प्रमुख नेत्यांच्या मुलांनाही उमेदवारी मिळाली आहे.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे, आणि मुंबईचे राजकीय चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी चौरंगी लढतीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी ऐनवेळी एकत्र येत युती केल्याने राजकीय वर्तुळात अनेक भुवया उंचावल्या आहेत. मुंबईतील 227 जागांसाठी प्रमुख चार आघाड्या आणि युत्या मैदानात आहेत. यामध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि रामदास आठवले यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (महायुती) यांचा एक गट आहे.
दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन युती केली आहे. तिसरी आघाडी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आहे, जिथे काँग्रेस 165 जागांवर तर वंचित 62 जागांवर लढणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईत 100 जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत आहे. ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युती मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि पुणे या महापालिकांमध्ये झाल्याची माहिती आहे. मुंबईत ठाकरे गटाच्या शिवसेनेला 160-165 जागा, मनसेला 50-52 जागा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10-12 जागा मिळाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

