Narayan Rane : ठाकरेंना शह देण्यासाठी राणेंची तोफ मुंबईत धडाडणार! कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
भाजपने आगामी मुंबई मनपासह इतर महापालिका निवडणुकांसाठी कोकणी मतांची जबाबदारी खासदार नारायण राणे यांच्यावर सोपवली आहे. ठाकरे गटाला शह देण्यासाठी राणे प्रचारात उतरणार असून, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील कोकणी मतदारांना एकत्रित करण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जात आहेत.
कोकणी मतांची धुरा भाजपकडून खासदार नारायण राणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबई मनपा निवडणुकीसोबतच इतर काही महापालिका निवडणुकांमध्येही राणे प्रचारात उतरणार आहेत. ठाकरे गटाला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ मुंबईत धडाडणार असून, याच अनुषंगाने त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भाजपकडून मुंबईत नेहमीच वेगवेगळ्या समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. आगामी निवडणुकांमध्ये मुंबईतील कोकणी मतदारांना पूर्णपणे एकत्रित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विविध प्रचार सभांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही रणनीती मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..

