Kalicharan Maharaj : कालीचरण बाबाला दोन दिवसांची पोलीस कोठडी, गांधींजींबाबत संतापजनक विधान भोवलं

Kalicharan Maharaj : कालीचरण बाबाला दोन दिवसांची पोलीस कोठडी, गांधींजींबाबत संतापजनक विधान भोवलं
कालीचरण बाबाला ठाणे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

गांधींबाबत संतापजन विधान करणाऱ्या कालीचरण बाबाला रायपूर कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कालीचरण बाबाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 30, 2021 | 10:19 PM

छत्तीसगड : महात्मा गांधींबाबत संतापजन विधान करणाऱ्या कालीचरण बाबाला रायपूर कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे कालीचरण बाबाच्या अडचणीत वाढ झाली आहे. कालीचरण बाबाला पुन्हा 1 तारखेला कोर्टात हजर करण्यात येणार आहे. छत्तीसगड पोलिसांनी कालीचरण बाबाला अटक करून कोर्टात हजर केले होते. त्यानंतर कोर्टाने बाबाची रवानगी कोठडीत केली आहे. गांधींबाबत संतापजनक विधान केल्यानंतर बाबावर देशभरातून टीकेची झोड उडाली होती.

कालीचरण बाबाविरोधात महाराष्ट्रातही तक्रारी दाखल

कालीचरण बाबाच्या वक्तव्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती, महाराष्ट्रातही कालीचरण बाबावरून राजकारण तापले होते, काँग्रेसने कालीचरण बाबाविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केले. तर राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा घेत कालीचरण बाबाविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. त्यामुळे कालीचरण बाबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. पण तुर्तास तरी कालीचरण बाबाचा मुक्काम दोन दिवस कोठडीत असणार आहे.

नेमके काय म्हणाले होते कालीचरण महाराज?

कालीचरण महाराज महाराष्ट्रातील अकोला येथील असल्याचे समजते. त्यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली होती. त्यातले काही शब्द तर इथे लिहिलेही जाऊ शकत नाही. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत कालीचरण महाराजानं गांधीजींना अपशब्द म्हटल्यानंतर नथूराम गोडसेचे आभार मानले आहेत. त्याच्या कृतीचं अभिनंदन केलंय. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जातंय. त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये जी धर्मसंसद पार पडली, त्यात कालीचरण महाराजानं हे तारे तोडले होते.

नववर्षाच्या जल्लोषाला दहशतवादी हल्ल्याचं सावट, रेल्वे पोलीस आयुक्तांनी जारी केला अलर्ट

Maharashtra Corona Update : आता बाळासाहेब थोरातही कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कातील लोकांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन

Uttar Pradesh: कोंबडा न दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जमावावर अंदाधुंद गोळीबार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें