AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uttar Pradesh: कोंबडा न दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जमावावर अंदाधुंद गोळीबार

दुकान बंद असल्याने मटण व्यापाऱ्याने कोंबडा देण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर संतप्त तरुणांनी मटण व्यापाऱ्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने मटण व्यापारी रक्तबंबाळ झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी जमाव जमा झाला.

Uttar Pradesh: कोंबडा न दिल्याच्या रागातून व्यापाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; जमावावर अंदाधुंद गोळीबार
दापोली तिहेरी हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 9:55 PM
Share

हरदोई : कोंबडा न दिल्याने भर बाजारपेठेत एका मटण व्यापाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची खळबळ घटना उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्य़ात घडली आहे. बंदुकीतून झाडलेल्या गोळ्यांचा मोठा आवाज आल्यानंतर हल्लेखोरांनी तेथून पळत असताना घटनास्थळी जमलेल्या जमावावरही अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी आरोपींपैकी दोघेजण जमावाच्या हाती लागले. जमावाने त्यांना अद्दल घडवत बेदम मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी सर्वप्रथम दोन्ही आरोपींना जमावाच्या तावडीतून वाचवले. गोळी लागून जखमी झालेल्या मटण व्यापारी आणि जमावाच्या मारहाणीत जखमी झालेल्या दोन आरोपींना गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र लखनौला उपचारासाठी नेत असताना मटण व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. गोळीबारात गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच व्यापाऱ्याची प्राणज्योत मालवली.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

हरदोई येथील रेती कोतवाली भागातील सदर बाजार येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. शहरातील सदर बाजार येथील औलाद गंज परिसरात राहणारा 18 वर्षीय सबील मुलगा मुन्ना कुरेशी हा चिकनचे दुकान बंद करून घरी जात होता. त्याचवेळी दुचाकीवरून तीन तरुण कोंबडा घेण्यासाठी बाजारात आले होते. त्यांनी चिकन सेंटर चालवणाऱ्या व्यापाऱ्याकडे कोंबडी देण्याची मागणी केली. त्यावर व्यापाऱ्याने कोंबडा न दिल्याने दुचाकीवरून आलेल्या तिघांचा पारा चढला आणि त्यांनी गोळीबार केला.

दुकान बंद असल्याने मटण व्यापाऱ्याने कोंबडा देण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर संतप्त तरुणांनी मटण व्यापाऱ्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. गोळी लागल्याने मटण व्यापारी रक्तबंबाळ झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून घटनास्थळी जमाव जमा झाला. त्यावर आरोपींनी जमावावर अंदाधुंद गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जमावाने दोन आरोपींना पकडून बेदम मारहाण केली.

दोन आरोपींना अटक; तिसऱ्याचा शोध सुरू

घटनेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांनाही जमावाच्या तावडीतून वाचवले आणि त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सुनील आणि वीरपाल अशी या अटक आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींकडून एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्या तिसऱ्या साथीदाराची माहिती गोळा करण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (Merchant shot dead in uttar pradesh anger over not giving cock)

इतर बातम्या

Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जाणार; वकिलांची माहिती

Pimpri -Chinchwad crime | पाच जणांच्या टोळक्याने ब्लेडने वार करत युवकाला लुटले

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.