Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जाणार; वकिलांची माहिती

Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जाणार; वकिलांची माहिती
Sangram Desai, Nitesh Rane.

भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, त्याआधी कणकवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले होते. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 30, 2021 | 6:30 PM

सिंधुदुर्गः नितेश राणे यांना कणकवणी सत्र न्यायालयाने मोठा झटका देत त्यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, तर दुसरीकडे नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी याप्रकरणी हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले राणेंचे वकील?
नितेश राणे यांचे वकील संग्राम देसाई म्हणाले की, आमच्यापुढे हायकोर्टात जाणे हा पर्याय आहे. यावर योग्य ती चर्चा करून एक-दोन दिवसांत निर्णय घेऊ. मात्र, शक्यतो उद्या हायकोर्टात केस दाखल करू. ती बोर्डावर यायला वेळ लागेल. दोन-तीन दिवस तरी लागतील. नितेश राणे यांनी आतापर्यंत पोलिसांना सहकार्य केले आहे आणि इथून पुढेही आम्ही पोलिसांना सहकार्य करू, असे देसाई म्हणाले.

शरण येणार नाही

संग्राम देसाई पुढे म्हणाले की, कोर्टाने नितेश राणे यांचा मोबाइल जप्त करून कस्टडी मागितली आहे. मात्र, आम्ही हायकोर्टात जाणार आहोत. तिथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करणार आहोत. तिथे सुनावणी होईपर्यंत आम्हाला बाजूला राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे नितेश राणे काही शरण वगैरे येणार नाहीत. मात्र, पोलिसांना तपासात आजपर्यंत सहकार्य केले आहे आणि मदत मागितली तरी ती करू, असे ते म्हणाले.

कणकवलीत फौजफाटा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असलेल्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. मात्र, त्याआधी कणकवलीत भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आले होते. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नितेश राणे यांना अटक यांना करावी याकरिता शिवसेनेचे आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू आक्रमक झालेत.

नितेश यांचा शोध सुरू

कणकवली पोलिसांकडूनही नितेश राणे यांचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, नितेश राणे सध्या अज्ञातवासात गेले आहेत. याच अनुषंगाने नितेश कुठे आहेत, याची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी नारायण राणे यांना काल नोटीस बजावली. मात्र, दहा मिनिटांत ही नोटीस काढून टाकण्यात आली. तर राणे यांनी आपण सध्या व्यस्त असून, सध्या चौकशीसाठी उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळवले आहे.

इतर बातम्याः

कुणाला कुठले मंत्रिपद हेही ठरलेले, काँग्रेस तयार झाल्यावर पवारांनी शब्द फिरवला-गिरीश महाजन

MPSC : आधी परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षार्थींना इशारा? महाराष्ट्र लोकसेवा आयोगावर टीका का होतेय?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें