बांगलादेशाला मोठा धक्का! या प्रमुख नेत्याचे निधन, दोनदा देशाचे पंतप्रधान म्हणून…
बांगलादेशातील सध्याची परिस्थिती जगापासून लपली नाहीये. बांगलादेशात मोठे हिंसाचार होत असून कॉलेज आणि विद्यापीठांना टार्गेट केले जात आहे. हेच नाही तर हिंदू लोकांनाही टार्गेट करून मारले जातंय. आता बांगलादेशातून मोठी बातमी पुढे येतंय.

मागच्या काही दिवसांपासून बांगलादेश अशांत आहे. बांगलादेशात मोठे हिंसाचार होत असून हिंदू लोकांना टार्गेट केले जात असून भर रस्त्यामध्ये नुकताच एका हिंदू युवकाची हत्या करण्यात आली. सातत्याने बांगलात हिंदूंवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. फक्त हेच नाही तर बांगलादेशातील भारतीय दूतावास कार्यालयावरही थेट दगडफेक करण्यात आली. निवडणुका तोंडावर असताना बांगलादेशात मोठी हिंसा भडकताना दिसत आहे. पाकिस्तानच्या नादी लागून स्वत: चे वाटूळे करून घेताना बांगलादेश दिसत आहे. शिवाय अमेरिकेकडूनही बांगलादेश मदत मागत आहे. आता बांगलादेशातून मोठी बातमी पुढे येताना दिसतंय. बांगलादेशच्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्या आणि माजी पंतप्रधान बेगम खालेदा झिया यांचे निधन झाले आहे. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील काही वर्षांपासून त्या आजारी असल्याचे सांगितले जाते.
बेगम खालेदा झिया यांनी दोनदा बांगलादेशाचे पंतप्रधान म्हणून काम बघितले. पहिल्यांदा 1991 ते 1996 आणि त्यानंतर 2001 ते 2006 पर्यंत. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधानही होत्या. त्यांचे पती झियाउर रहमान हे बांगलादेशचे लष्करी शासक आणि राष्ट्राध्यक्ष होते. पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली. विशेष म्हणजे त्यांचा कार्यकाळही चांगला राहिला. बेगम खालेदा झिया यांच्या पतीची हत्या 1981 मध्ये करण्यात आसी.
तेव्हापासून त्यांनी पक्षाचे नेतृत्व आपल्या हातात घेतले. आता त्यांचा मुलगा तारिक रहमानने पक्षाची सूत्रे हाती घेतली आहेत. तारिक रहमान गेल्या अनेक वर्षांपासून बांगलादेशापासून दूर होते. तब्बल 17 वर्षानंतर ते बांगलादेशात परतले आहेत. सध्याच्या बांगलादेशची स्थिती बघता त्यांनी परत बांगलादेशात येण्याचा निर्णय घेतला. ते 17 वर्ष लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत बोते.
हेच नाही तर फेब्रुवारीमध्ये बांगलादेशात निवडणुका आहेत आणि त्यांना बांगलादेशचे भावी पंतप्रधान म्हणून लोक बघत आहेत. सध्या बांगलादेशात जी स्थिती आहे, त्यामधून तेच बाहेर काढू शकतात, असे बांगलादेशच्या जनतेला वाटते. मात्र, बांगलादेशात तारिक रहमान येताच बेगम खालेदा झिया यांचे निधन झाले. बांगलादेशातील सध्याची स्थिती अत्यंत वाईट असून कट्टरपंथींकडून विद्यापीठे आणि कॉलेज टार्गेट केली जात आहेत.
