Planet Marathi : मराठीतील एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला, ‘प्लॅनेट मराठी’ सर्वत्र चर्चा

| Updated on: Jan 24, 2021 | 1:32 AM

मराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता, मराठी कलाकाराचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे 'प्लॅनेट मराठी' . (The only OTT medium in Marathi is coming soon, 'Planet Marathi' is in the trend )

Planet Marathi : मराठीतील एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला, प्लॅनेट मराठी सर्वत्र चर्चा
Follow us on

मुंबई : गेले अनेक दिवस सोशल मीडिया बातम्या आणि कलाकारांच्या पोस्टमध्ये ‘प्लॅनेट मराठी’ या प्लॅटफॉर्म बद्दल बोललं जातंय. तर सुरुवातीला या प्लॅटफॉर्मचं नक्की उद्देश तरी काय असा प्रश्न अनेकांना पडला. तर मराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता, मराठी कलाकाराचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे ‘प्लॅनेट मराठी’ आणि गेले अनेक दिवस हे प्लॅटपॉर्म चर्चेत आहे. थोड्या काळात यशाचं शिखर गाठणाऱ्या या प्लॅटफॉर्मचा चेहरा आहे अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण. येत्या काळात प्लॅनेट मराठीच्या काही वेबसीरिज आणि नवीन संहिता असलेले काही नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आहेत असं म्हटलं जातं. मराठी सिनेमांचे विषय, कथानकांतलं वेगळेपण, सादरीकरणाची पद्धत या सगळ्याच बाबतीत कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. मराठी सिनेमा जाहिरातीत कुठल्याही प्रकारे मागे पडू नये या हेतूनं ‘प्लॅनेट मराठी’ या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली. अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण त्यासाठी काम करतोय. विशेष म्हणजे ‘ट्विटर इंडिया’सोबत असोसिएशन असलेलं हे एकमेव आणि पहिलं मराठी वेबचॅनेल आहे. भाषिक ओटीटीमाध्यमांच्या लाटेत आगामी ‘प्लॅनेट मराठी’ची चर्चा सुरू आहे. मराठीतील पाहिलंवहिलं आणि एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला येणारे.

अक्षय बर्दापूरकरनं हे प्लॅटफॉर्म सुरू केलं खरं पण आता ही टीम प्रचंड मोठी होत चालली आहे. नुकतंच महाराष्ट्राचा मोस्ट एनर्जेटिक मॅन ‘प्लॅनेट टॅलेंट’मध्ये सामील झाला आहे. सोबतच अभिनेत्री अमृता खानविलकर, गायत्री दातार, सायली संजीव, शिवानी बावकर, अभिनेता निखिल चव्हाण, दिग्दर्शक-सिनेमाटोग्राफर संजय जाधव या भारी लोकांची प्लॅनेट मराठीमध्ये दमदार एन्ट्री होणार आहे.

एवढंच नाही मराठीतील एकमेव ओटीटी माध्यम लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे मराठी चित्रपट, नाटक आणि कलाकारांचे चांगले दिवस येतील हे नक्कीये.