Special Story : चित्रपटांच्या मुद्द्यावरुन वाद का निर्माण होतात?; ‘फिक्शन’ आणि ‘नॉनफिक्शन’ म्हणजे नक्की काय?, वाचा सविस्तर

| Updated on: Jan 23, 2021 | 9:39 AM

फिक्शन आणि नॉन फिक्शन म्हणजे नक्की काय ? वाचा सविस्तर. (Why do films create controversy ?; What exactly do 'fiction' and 'nonfiction' mean ?, read in detail)

Special Story : चित्रपटांच्या मुद्द्यावरुन वाद का निर्माण होतात?; फिक्शन आणि नॉनफिक्शन म्हणजे नक्की काय?, वाचा सविस्तर
Follow us on

मुंबई: एखाद्या सत्य घटनेवर आधारित मालिका, चित्रपट किंवा अगदीच लघूपट तयार करण्याचा विचार निर्मात्यानं किंवा दिग्दर्शकानं केला, की पहिला प्रश्न येतो तो म्हणजे सिमेमॅटिक लिबर्टी वापरायची का? आणि उत्तर हो असेल तर ती किती वापरायची? गेले अनेक वर्ष कित्येक चित्रपटांवरुन वाद झालेले आपण पाहतोय. एवढंच काय तर आता ओटीटीवर येत असलेल्या वेब सीरिजबद्दल किंवा चित्रपटांबद्दलसुद्धा हेच घडतंय. जरा भूतकाळात जाऊन बघितलं तर सिनेमॅटिक लिबर्टी घेतल्याने झालेल्या वादाचे अनेक किस्से सापडतील. या वादामुळे दंगे झाल्याचं, चित्रपटगृह फोडण्यात आल्याचं आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याचं आढळून येईल.

‘या’ सिनेमांना बसला फटका

‘पद्मावत’, ‘जोधा अकबर’, मणिकर्णिका अशा अनेक चित्रपटांच्या बाबतीत हे घडलंय. इतिहासाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचा आरोप या चित्रपटांच्या बाबतीत करण्यात आला. ‘पद्मावत’ चित्रपटाच्यावेळी तर दीपिकाचं नाक कापण्यापर्यंत वाद आला होता. असो. तर हा पसारा मांडण्यामागचं कारण म्हणजे ‘तांडव’. आता तांडव या वेब सीरिजमुळे देशभरात तांडव होतोय. या सीरिजच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आणि ती पूर्ण होतानासुद्धा दिसतेय.

‘तांडव’चा नेमका वाद काय?

तांडवमध्ये एक पौराणिक प्रसंग आहे. त्यात हिंदू देवी-देवतांवर टीका करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. ‘तांडव’ वेब सीरीजमध्ये ‘नारायण-नारायण. देवा काहीतरी कर. रामजींचे अनुयायी सोशल मीडियावर सतत वाढत आहे’, अशा आशयाचा एक संवाद आहे. या संवादासोबातच, इतर बरेच संवाद देखील वादात अडकले आहेत. सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली दिग्दर्शकाने कॉलेज गॅदरिंगच्या निमित्ताने हा पौराणिक प्रसंग रंगवून सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं असावं, असं सांगितलं जातं. या सीनमध्ये दिग्दर्शकांनी सिनेमॅटिक लिबर्टी वापरली. ती वापरली नसती तर हा वाद वाढला नसता का?, असा सवालही या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

फिक्शन आणि नॉन फिक्शन

सिनेमात ‘फिक्शन’ आणि ‘नॉनफिक्शनल’ असे दोन प्रकार आहेत. फिक्शनल म्हणजेच “कल्पनारम्य” कल्पनेतून निर्मित साहित्य आणि कथा. रहस्यं, सायन्स फिक्शन, रोमांन्स, कल्पनारम्य, चिक लीट, क्राईम थ्रिलर हे सर्व फिक्शनमध्ये येतं. तर ‘नॉनफिक्शन’ म्हणजेच वास्तविकतेवर आधारित साहित्य. नॉनफिक्शनमध्ये चरित्र, व्यवसाय, आरोग्य आणि फिटनेस, इतिहास, गुन्हा, यासह अनेक श्रेणींमधील पुस्तकं आणि व्हिडीओ आहेत. या पुस्तकांवर आधारिक कथा असल्यास ती नॉनफिक्शनमध्ये मोडते.

प्रश्न अनुत्तरीतच

तर तांडव या वेब सीरीजच्या सुरुवातील ‘This program is made for viewer entertainment and is a work of FICTION’ अशी प्लेट दिली आहे. अशा परिस्थितीत ही काल्पनिक कथा असल्याचं स्पष्ट होतं. तरीही या वेब सीरिजवरून वाद घातला जात आहे. त्यामुळे ‘फिक्शन’,’नॉनफिक्शन’ आणि ‘सिनेमॅटिक लिबर्टी’.