Astro rules for Ruby | ईच्छापूर्तीसाठी माणिक परिधान करताय? मग काही नियम नक्की लक्षात ठेवा

| Updated on: Nov 11, 2021 | 4:30 PM

ज्योतिषशास्त्रात सूर्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आत्मशक्तीची देवता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्याला हे सर्व सुख प्राप्त होते, तर जेव्हा कमजोर असते तेव्हा त्याला हे सर्व सुख मिळविण्यात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो.

Astro rules for Ruby | ईच्छापूर्तीसाठी माणिक परिधान करताय? मग काही नियम नक्की लक्षात ठेवा
Manik
Follow us on

मुंबई: ज्योतिषशास्त्रात सूर्याला सुख, समृद्धी, आरोग्य आणि आत्मशक्तीची देवता म्हणून ओळखले जाते. असे मानले जाते की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असतो त्याला हे सर्व सुख प्राप्त होते, तर जेव्हा कमजोर असते तेव्हा त्याला हे सर्व सुख मिळविण्यात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. सूर्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी आणि त्याची शुभ प्राप्ती करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात माणिक धारण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. माणिक हे रत्नवापरले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याचे प्रभुत्व असते त्यांनी माणिक धारण केले पाहिजे.

रुबी कसे ओळखावे

दुधात खरा माणिक रत्न टाकल्यास दुधाचा रंग गुलाबी होतो. तसेच पांढऱ्या चांदीच्या भांड्यात माणिक सूर्यासमोर ठेवल्यास चांदीचे भांडे लाल रंगाचे दिसू लागते.

माणिक रत्नाचे लाभ:

सूर्य ग्रहाचा रत्न माणिक खूपच चमकदार घट्ट लाल व गुलाबी रंगाचा असतो.
डोळ्यां बाबत त्रास होत असतील तर हा रत्न धारण करावा.
या रत्नाच्या प्रभावा मुळे प्रेमाच्या भावना जागृत होतात व व्यक्तित नेतृत्व करण्याचे गुण उत्पन्न होतात.
सरकारी क्षेत्रात काम करत असणाऱ्या लोकांसाठी हा रत्न खूप लाभकारी असतो.
कामकाजात लाभ आणि आपल्या प्रगति साठी हा रत्न धारण केला जातो.
आजारामुळे त्रास होत असतील व त्या पासून सुटका पाहिजे असेल तर हा रत्न अवश्य धारण करावा.

(येथे दिलेली महिती धार्मिक श्रद्धा आणि लोक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)

इतर बातम्या : 

Dev Uthani Ekadashi 2021 | लग्नाचे मुहूर्त काढताय?, मग 6 गोष्टी नक्की लक्षात घ्या, नाहीतर येतील अनेक अडथळे

Vastu and health | आजच दोषमुक्त करा वास्तूदोष, नाहीतर आजारांनी वेढा घातलाच म्हणून समजा

Devuthani Ekadashi 2021 | प्रबोधिनी एकादशी कधी साजरी होते, जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व