Ganpati Visarjan 2021 | अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा

| Updated on: Sep 19, 2021 | 12:15 PM

दरवर्षी गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होतो जो पुढील 10 दिवस अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. आज अनंत चतुर्दशी आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. अनंत चतुर्दशच्या दिवशी गणपती विसर्जन होते. भक्त या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतात.

Ganpati Visarjan 2021 | अनंत चतुर्दशीच्या दिवशीच गणपतीचे विसर्जन का केले जाते? जाणून घ्या यामागील पौराणिक कथा
Lord Ganesha
Follow us on

मुंबई : दरवर्षी गणेशोत्सव भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीपासून सुरू होतो जो पुढील 10 दिवस अर्थात अनंत चतुर्दशीपर्यंत असतो. आज अनंत चतुर्दशी आहे. हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. अनंत चतुर्दशच्या दिवशी गणपती विसर्जन होते. भक्त या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देतात. असे मानले जाते की बाप्पा आपल्या भक्तांचे दुःख दूर करतो आणि त्यांच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, बाप्पाच्या पूजेनंतर दहा दिवसांनी विसर्जन का केले जाते आणि त्यामागचे कारण काय असू शकते.

हिंदू धर्मात गणेशाला प्रथम पूजनीय देवता म्हणून ओळखले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते जेणेकरुन त्या कार्यात कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ नये. म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते. असे मानले जाते की जेव्हा गणेशाची मूर्ती बाहेर काढली जाते, तेव्हा तो त्याच्यासोबत नकारात्मक शक्ती आणि अडथळे देखील घेऊन जातो आणि तुमच्या जीवनात आनंद, समृद्धीचा वास होतो.

महाभारताशी संबंधित कथा

पौराणिक कथेनुसार महाभारतासारखा महान ग्रंथ गणेशजींनी लिहिला होता. असे म्हटले जाते की ऋषी वेद व्यासांनी महाभारत आत्मसात केले होते. परंतु ते ते लिहिण्यात असमर्थ होते. हा ग्रंथ लिहिण्यासाठी कुठल्या दैवी आत्म्याची गरज होती जे न थांबता हा ग्रंथ लिहू शकतील. ऋषी वेद व्यास यांनी या समस्येचे निराकरण करण्यासाठी ब्रह्माजींकडे प्रार्थना केली. त्यांनी सुचवले की गणेश ही बुद्धीची देवता आहे. ते नक्कीच तुम्हाला मदत करतील.

मग, ऋषी वेद व्यास यांनी गणेशजींना महाभारत लिहिण्याची विनंती केली आणि त्यांनी त्याला मान्यता दिली. ऋषी वेद व्यास यांनी महाभारताची कथा चतुर्थीच्या दिवसापासून कथन केली आणि गणेशजी निरंतर लिहीत राहिले. 10 व्या दिवशी जेव्हा ऋषी वेद व्यास यांनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी पाहिले की गणेशाच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. शरीराचे तापमान कमी करण्यासाठी ऋषी वेद व्यास यांनी त्यांच्या शरीरावर मातीचा लेप लावला आणि ती माती सुकल्यावर गणेशाला शीतलता प्रदान करण्यासाठी नदीत डुबकी लावायला सांगितली. तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची स्थापना केली जाते आणि विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

अनंत चतुर्दशीची तिथी, शुभ वेळ आणि महत्व जाणून घ्या; विष्णु देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ‘हे’ करा

Ganesh Mahotsav 2021 : गणपतीला का असतात चार हात, या गोष्टींचं प्रतीक, जाणून घ्या