Ganeshotsav 2022: लालबागचा राजा येतोय डोळ्यासमोर, जेव्हा तुम्ही गोल बाजार गणपतीला पाहाल

| Updated on: Sep 05, 2022 | 4:01 PM

मुंबईचा लालबागचा राजा म्हंटल की डोळ्यासमोर येतो त्याच्या डोक्यावर असलेले सोन्याचे रत्नजडित मुकुट! असाच एक गणपती रायपूरच्या गोलबाजार परिसरात देखील आहे. या गणपतीचे दर्शन घेत असताना मुंबईच्या लालबागच्या राजाची हमखास आठवण येते.

Ganeshotsav 2022: लालबागचा राजा येतोय डोळ्यासमोर, जेव्हा तुम्ही गोल बाजार गणपतीला पाहाल
गोल बाजार रायपूर
Image Credit source: Social Media
Follow us on

सध्या देशभरात गणेशोत्सवाची (Ganeshotsav 2022) धूम सुरु आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे. मुंबईचा लालबागचा राजा गणपती (Dagdusheth Ganpati) देशात प्रसिद्ध आहे. या गणपतीच्या चरणी दरवर्षी कोट्यवधींचे दान येते. इतकेच काय कर सोन्या-चांदीचे दागिने देखील भाविक श्रद्धेने दान करतात.  मुंबईचा लालबागचा राजा म्हंटल की डोळ्यासमोर येतो त्याच्या डोक्यावर असलेले सोन्याचे रत्नजडित मुकुट! असाच एक गणपती रायपूरच्या गोलबाजार परिसरात देखील आहे. या गणपतीचे दर्शन घेत असताना मुंबईच्या लालबागच्या राजाची हमखास आठवण येते. याचे कारण म्हणजे या गणपतीच्या डोक्यावरसुद्धा तसेच सोन्याचे रत्नजडित मुकुट आहे. रायपूरच्या गोलबाजार (Gol bajar Raipur) हनुमान मंदिरासमोर असलेल्या या गणपतीच्या (Ganpati) दर्शनासाठी भाविक दूरवरून येतात.

लालबागच्या राजाचे मुकुट भावले

गणेश मंडळाचे काही सदस्य सात वर्षांआधी मुंबईत लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते. तिथल्या गणपतीचे सोन्याचे  मुकुट त्यांना खुपच भावले. त्यावरून प्रेरित झालेल्या मंडळाच्या अध्यक्षांनी गोलबाजार येथील व्यापाऱ्यांशी चर्चा केली.व्यापाऱ्यांनी देखील सोन्याचे मुकुट बनविण्याच्या कल्पनेला होकार दिला. त्यानंतर सर्वांच्या सहयोगातून राशी देखील जमा करण्यात आली आणि पाऊण किलोचा सोन्याचा रत्नजडित मुकुट तयार करण्यात आला. सहा वर्षांपासून गोलबाजारच्या या गणपतीला हा मुकुट घालण्यात येत आहे.

गणेशोत्सवात आकर्षक देखावा

गोलबाजार गणेश मंडळातर्फे दरवर्षी गणेशोत्सवात आकर्षक देखावा तयार करण्यात येतो. यंदा शिव परिवारातील श्री गणेश, कार्तिकेय, पार्वती आणि श्री राम, लक्ष्मण, जानकी, हनुमान यांच्या मूर्तींची सजावट कार्यक्रमस्थळी  करण्यात आली आहे. सायंकाळी 7.30 वाजता होणाऱ्या महाआरतीला गोलबाजारचे शेकडो व्यापारी उपस्थित असतात. व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता मुकुट काढण्यात येते आणि दुसऱ्यादिवशी सकाळी पूजेच्यावेळी परत मुकुट चढविले जाते.

हे सुद्धा वाचा