Bhai Dooj 2021 : भाऊबीजेचा सण का साजरा करतात, जाणून घ्या पौराणिक कथा आणि शुभ मुहूर्त

| Updated on: Nov 05, 2021 | 1:52 PM

भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाशी संबंधित आहे. यादिवशी, बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर प्रेमाने टिळा लावताता आणि त्यांना दीर्घायुष्य, चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतात. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजऱ्या होणाऱ्या या सणाला भाई टिका, यम द्वितीया, भात्री द्वितीया असेही म्हणतात.

Bhai Dooj 2021 : भाऊबीजेचा सण का साजरा करतात, जाणून घ्या पौराणिक कथा आणि शुभ मुहूर्त
Bhaubeej
Follow us on

मुंबई : भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाशी संबंधित आहे. यादिवशी, बहिणी आपल्या भावांच्या कपाळावर प्रेमाने टिळा लावताता आणि त्यांना दीर्घायुष्य, चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देतात. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून साजऱ्या होणाऱ्या या सणाला भाई टिका, यम द्वितीया, भात्री द्वितीया असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळा लावते त्याला अकाली मृत्यूची भीती नसते.

यावर्षी भाऊबीजेचा सण हा 6 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी साजरा केला जाईल. भाऊबीजचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मात्र, हा सण का साजरा केला जातो यामागील कारण काय हे तुम्हाला माहितीये का?

भाऊबीजेचा सण का साजरा केला जातो, जाणून घ्या यामागील आख्यायिका –

असे मानले जाते की या दिवशी जी बहीण आपल्या भावाच्या कपाळावर टिळा लावते त्याला अकाली मृत्यूचे भय राहत नाही. यामागे एक आख्यायिका आहे. पौराणिक कथेनुसार, यमुना ही आपला भाऊ यमराजला भेटण्यासाठी अनेकदा आमंत्रम देत असत. पण, तरीदेखील यमराज त्यांना भेटायला जायचे नाही. मग एके दिवशी यमराज आपल्या बहिणीला भेटायला पोहोचले. त्यांना पाहून यमुनेला खूप आनंद झाला. यमुनेनी यमराजांचे खूप प्रेमाने आणि आदराने आदरातिथ्य केले. त्यांच्यासाठी वेगवेगळे पदार्थ तयार केले. तसेच त्यांना टिळा लावून त्यांनी आरती केली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

बहिणीचे हे प्रेम पाहून यमराज खूप आनंदी झालेत आणि त्यांनी तिला एक वरदान मागायला सांगितले. तेव्हा, यमुना म्हणाली की, दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही माझ्या घरी यावे आणि जो कोणी भाऊ या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी जाऊन टिळा लावेल, त्याला यमाची आणि अकाली मृत्यूची भीती बाळगायची गरज पडू नये. यमराजाने आपल्या बहिणीची ईच्छा पूर्ण केली आणि तिला तिने मागितलेले वरदान दिले. तेव्हापासून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाऊ लागला.

भाऊबीजेचा शुभ मुहूर्त काय?

हिंदू दिनदर्शिकेनुसार या वर्षी भाऊबीजचा पवित्र सण 6 नोव्हेंबर 2021 रोजी साजरा केला जाईल. यावर्षी भावाला औक्षण करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:10 ते दुपारी 3:21 पर्यंत असेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

इंद्राचा अहंकार आणि दुर्वास ऋषींचा शाप, समुद्र मंथनातून प्रकटलेल्या लक्ष्मी देवीची दिवाळीला पूजा का करतात?

Govardhan Puja 2021 : दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी का केली जाते गोवर्धन पूजा? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा करण्याची पद्धत