AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इंद्राचा अहंकार आणि दुर्वास ऋषींचा शाप, समुद्र मंथनातून प्रकटलेल्या लक्ष्मी देवीची दिवाळीला पूजा का करतात?

दिवाळी हा प्रकाशाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात हा सण प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक घरात देवी लक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते. यानंतर दिवा लावून संपूर्ण घर प्रकाशमय केले जाते. या दिवशी प्रभू श्रीराम रावणाचा वध करुन विजयी होऊन अयोध्येला परतले होते, अशी मान्याता आहे.

इंद्राचा अहंकार आणि दुर्वास ऋषींचा शाप, समुद्र मंथनातून प्रकटलेल्या लक्ष्मी देवीची दिवाळीला पूजा का करतात?
Diwali-2021
| Edited By: | Updated on: Nov 04, 2021 | 1:42 PM
Share

Diwali 2021 : मुंबई : दिवाळी हा प्रकाशाचा सण आज देशभरात उत्साहात साजरा केला जात आहे. देशभरात हा सण प्रकाशाचा सण म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक घरात देवी लक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते. यानंतर दिवा लावून संपूर्ण घर प्रकाशमय केले जाते. या दिवशी प्रभू श्रीराम रावणाचा वध करुन विजयी होऊन अयोध्येला परतले होते, अशी मान्याता आहे.

प्रभू श्री राम, माता सीता आणि लक्ष्मण हे सुखरुप परतले याच्या आनंदात प्रजेने दिवे लावून घरे उजळून टाकली. तेव्हापासून दिवा लावण्याची परंपरा सुरु झाली. पण, अशा परिस्थितीत बहुतांश लोकांच्या मनात प्रश्न पडतो की, जर हे दिवे श्री रामाच्या पुनरागमनाच्या स्मरणार्थ प्रज्वलित केले जातात, तर या दिवशी श्री राम ऐवजी माता लक्ष्मीची पूजा का केली जाते? आज संध्याकाळी पूजेचा शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचे कारण हे सर्व काही येथे जाणून घ्या –

दिवाळीच्या पूजेचा शुभ मुहूर्त काय?

दिवाळीत श्री गणेश-लक्ष्मीच्या पूजेसाठी सर्वात शुभ मुहूर्त संध्याकाळी 6.10 ते 8.00 पर्यंतचा आहे. याशिवाय रात्री 8:10 ते 10:15 मिनिटांपर्यंतही शुभ मुहूर्त असेल. स्टेशनरी पुस्तक, शैक्षणिक संस्था, बूट फॅक्टरी, कापड व्यवसाय, पेट्रोल पंप, लोखंड, सोने-चांदीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी दुकानातील पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 1 ते 4.30 पर्यंत असेल.

पूजा कशी करावी?

? सर्वप्रथम एका चौकटीवर लाल रंगाचे आसन घाला

? त्यावर श्रीगणेश-देवी लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा

? देवी लक्ष्मीपुढे तेलाचा दिवा आणि गणेशासमोर तुपाचा दिवा लावा

? यानंतर त्यांचे स्मरण करुन पूजेला सुरुवात करा

? गणेशाला कुंकू, अक्षता, फुले, दुर्वा, धूप, दीप इत्यादी अर्पण करा

? देवी लक्ष्मीला कुंकू, पिवळे चंदन, अक्षता, हळद, धणे, गुळ, कमळगट्टे, कमळाचे किंवा गुलाबाचे फूल, धूप इत्यादी अर्पण करा

? गणपतीला लाडू आणि देवी लक्ष्मीला दुधापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थ अर्पण कराॉ

? अन्न आणि लोणी अर्पण करा

? यानंतर मंत्रांचा जप करा आणि आरती करा

? पूजेनंतर संपूर्ण घरात दिवा लावावा

देवी लक्ष्मीची पूजा का केली जाते?

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनापूर्वी देव आणि दानवांचे युद्ध सुरु होते. देवतांना महालक्ष्मीचा वरदान लाभला होता, त्यामुळे दानव त्यांना इजा करु शकत नव्हते. त्यामुळे इंद्रदेवता अहंकारी झाले होते. एकदा दुर्वास ऋषी गळ्यात माळ घालून स्वर्गाकडे जात होते. वाटेत त्यांना इंद्र भेटले. त्याला पाहून दुर्वास ऋषी हे खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी इंद्राच्या दिशेने माळ फेकला. पण, इंद्र आपल्याच नादात होता. तेव्हा ती माळ इंद्राच्या गळ्यात पडली नसून ऐरावत हत्तीच्या गळ्यात पडली.

हे पाहून दुर्वास ऋषी संतापले आणि त्यांनी इंद्राला शाप दिला की ज्या शक्तीमुळे तू इतका अहंकार बाळगतो आहेस, ती पाताळात जावी. यानंतर देवी लक्ष्मी पाताळात गेली. देवीच्या जाण्याने देवांची शक्ती कमी झाली आणि दानव प्रबळ झाले. जेव्हा त्रासलेले देव ब्रह्माजींकडे पोहोचले तेव्हा त्यांनी समुद्रमंथन करण्याविषयी सांगितले.

समुद्रमंथन हजारो वर्षे चालले. त्यातून अनेक रत्ने आणि अमृत निघाले. त्याचवेळी देवी लक्ष्मीही पाताळातून बाहेर पडली. ज्या दिवशी देवी लक्ष्मीचे आगमन झाले, तो दिवस कार्तिक महिन्यातील अमावास्येचा दिवस होता. देवी लक्ष्मीच्या आगमनाच्या वेळी सर्व देवी-देवता हात जोडून तिची पूजा करत होते. तेव्हापासून हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित केला जातो. दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.

लक्ष्मीसोबत गणेशाची पूजा का केली जाते?

देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हटले जाते. असे म्हणतात की जिथे लक्ष्मीची कृपा असते तिथे कशाचीही कमतरता नसते. पण, लक्ष्मीला विवेकाशिवाय सांभाळता येत नाही. श्रीगणेशाला बुद्धीची देवता मानले जाते. देवी लक्ष्मी गणेशाला आपला पुत्र मानते. यामुळेच दिवाळीच्या दिवशी विघ्नहर्त्या गणेशाची आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते. जेणेकरुन दोघांचे आशीर्वाद कुटुंबावर राहतील आणि जीवनात सर्व काही शुभ होईल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diwali 2021 : दिवाळीच्या दिवशी चपातीशी संबंधित हे उपाय करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Diwali 2021: घरच्या घरी लक्ष्मीपूजन कसे करावे, जाणून घ्या पूजेची पद्धत

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.