AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार बदलणार! कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद मिळाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार बदलाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 2024 टी20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर रोहित शर्माने निवृत्ती घेतली होती. त्यामुळे कर्णधारपद सुरूवातीच्या मालिकेत शुबमन गिलकडे आलं आणि त्यानंतर सूर्यकुमार हाती नेतृत्व गेलं. आता पुढच्या वर्ल्डकपसाठी नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे.

भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार बदलणार! कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या
भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार बदलणार! कोण करणार नेतृत्व? जाणून घ्या Image Credit source: Icc X account
| Updated on: Mar 09, 2026 | 5:50 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेचे जेतेपद मिळवल्यानंतर रोहित शर्माने या फॉर्मेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे नेतृत्व बदल होणार हे निश्चित झालं होतं. भारतीय संघ त्याने झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला तेव्हा शुबमन गिलने नेतृत्व केलं. पण त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या हाती सूत्र सोपवली गेली. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत त्याने ही धुरा व्यवस्थितरित्या सांभाळली आणि संघाला जेतेपद मिळवून दिलं. आता बीसीसीआयला 2028 टी20 वर्ल्डकप आणि ऑलिम्पिक स्पर्धेसाठी तयारी करावी लागणार आहे. यासाठी नवं नेतृत्व शोधावं लागणार आहे. कारण सूर्यकुमार यादव 35 वर्षांचा झाला असून पुढच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणं कठीण असल्याची चर्चा आहे. सूर्यकुमार यादवला अशीच सूचना देण्यात आल्याचं समोर येत आहे. पण सूर्यकुमार यादव टी20 संघात कायम असेल.

सूर्यकुमार यादवच्या जागी नवीन कर्णधार निवडण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये एकच कर्णधार असावा यासाठी बीसीसीआय आग्रही आहे. त्यामुळे वनडे आणि कसोटी संघाची धुरा असलेल्या शुबमन गिलकडे कर्णधारपद दिलं जाण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी शुबमन गिलची जागा टी20 संघात होणं आवश्यक आहे. यासाठी बीसीसीआयने टी20 वर्ल्डकपपूर्वी प्रयत्न केला होता. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत त्याला संघात घेतलं होतं. इतंकच काय त्याच्याकडे उपकर्णधारपही सोपवलं होतं. पण कामगिरी हवी तशी झाली नाही. त्यामुळे त्याला टी20 वर्ल्डकप संघातून वगळण्यात आलं. गेल्या महिन्यांपासून शुबमन गिल देशांतर्गत क्रिकेटमध्ये घाम गाळत आहे. शुबमन गिलला आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचं देखील आव्हान आहे.

शुबमन गिलकडे इंडियन प्रीमियर लीगमधून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा मार्ग आहे. गिलने या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली तर तो निश्चितच भारतीय टी20 संघात पुनरागमन करेल.शुबमन गिलने सातत्यपूर्ण कामगिरीसह गुजरात टायटन्स संघाचे यशस्वी नेतृत्व केले तर त्याची भारतीय टी20 संघाच्या कर्णधारपदी निवड केली जाईल. नाही तर हार्दिक पांड्याला कर्णधारपद दिले जाऊ शकते. सूर्यकुमार यादवनंतर टीम इंडियाच्या टी20 संघाचा कर्णधार कोण असेल हे ठरवण्यासाठी आयपीएल संपेपर्यंत वाट पहावी लागेल.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...