AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारला दणका! RTE कायद्यातील त्या तरतुदीवर कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय; महत्त्वाची अट…

आरटीई कायद्याअंतर्गत शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक दुर्बल गटातील मुलांना कोणत्याही खासगी शाळेत प्रवेश दिला जातो. याच कायद्यामधील राज्य सरकारने एक नवा नियम आणला होता. त्याबाबत न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

राज्य सरकारला दणका! RTE कायद्यातील त्या तरतुदीवर कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय; महत्त्वाची अट...
rte educationImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 09, 2026 | 5:43 PM
Share

RTE Education : आरटीई कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये वंचित आणि दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. त्यासाठी 25 टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. याच कायद्याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या एक किमीचा अंतराचा निर्णय न्यायालयाने स्थगित केला आहे. याआधी सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत शाळेत प्रवेश मिळवायचा असेल तर विद्यार्थाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरात असलेली शाळाच निवडता येत होती.

न्यायालयाने नेमका काय निर्णय दिला?

आरटीई प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या एक किमीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी विद्यार्थाच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटर परिसरातील शाळाच निवडता येत होती. सरकारच्या या निर्णयाला अॅड. बोधी रामटेके आणि अॅड दीपक चटप यांनी आव्हान देत नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

एक किलोमीटरची अट लादणे म्हणजे….

याच विषयाची याचिका सामाजिक कार्यकर्ते आशिष फुलझेले,अनिकेत कुत्तरमारे यांनीही केली होती. आज या दोन्ही याचिकांवर सुनावणी करत कोर्टाने सरकारच्या आरटीई प्रवेशाच्या 1 किमी अटीला स्थगिती दिली. “1 किलोमीटरची अट आरटीई कायद्यात कुठेही नाही. शिक्षण हक्क कायदा हा केंद्र सरकारचा आहे. त्यात राज्य सरकार सुधारणा करून एक किलोमीटरची अट लादणे म्हणजे एका हाताने अधिकार देऊन दुसऱ्या हाताने काढून घेण्यासारखं आहे, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

1 किमीची अट मनमानी, अवैध आणि संविधानविरोधी

दरम्यान, शिक्षण हक्क कायदा हा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. 1 किमीची अट मनमानी, अवैध आणि संविधानविरोधी असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता पालकांना आपल्या मुलांसाठी कोणतीही शाळा निवडता येणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना