मुंबई : दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी होणारी दिवाळी यंदा 4 नोव्हेंबरला साजरी होणार आहे. दिवाळी हा देवी लक्ष्मीला समर्पित केलेला सण आहे. या दिवशी उपासक समृद्धी आणि संपत्तीची देवी लक्ष्मीची प्रार्थना करतात. बहुतेक हिंदू कुटुंबे दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी झेंडूच्या फुलांनी आणि अशोक, आंबा आणि केळीच्या पानांनी त्यांची घरे आणि कामाची जागा सजवतात. लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे आणि घरांमध्ये समृद्धी, संपत्ती आणि सद्भावनेसाठी तिची पूजा केली जाते.