Statue Of Equality: संत रामानुजाचार्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक: नरेंद्र मोदी

| Updated on: Feb 05, 2022 | 7:29 PM

जेव्हा देशात रुढीवादी परंपरा होती, भेदाभेद होता त्याकाळात संत रामानुजाचार्य यांनी समानतेचा विचार दिला. ज्या दलितांना अस्पृश्य समजले जात होते, त्यांना रामानुजाचार्य यांनी सन्मान दिला. त्यांनी भेदाभेद दूर करण्यासाठी आयुष्य वेचलं.

Statue Of Equality: संत रामानुजाचार्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक: नरेंद्र मोदी
संत रामानुजाचार्यांचे विचार आजही जगाला मार्गदर्शक: नरेंद्र मोदी
Follow us on

हैदराबाद: जेव्हा देशात रुढीवादी परंपरा होती, भेदाभेद होता त्याकाळात संत रामानुजाचार्य (Sant Ramanujacharya) यांनी समानतेचा विचार दिला. ज्या दलितांना अस्पृश्य समजले जात होते, त्यांना रामानुजाचार्य यांनी सन्मान दिला. त्यांनी भेदाभेद दूर करण्यासाठी आयुष्य वेचलं. त्यांचे विचार हे समतेवर आधारित होते. त्यामुळेच त्यांचे विचार आजही तितकेच प्रासंगिक आहेत. त्यांचे हे विचार केवळ देशालाच नव्हे तर जगालाही मार्गदर्शक आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते संत रामानुजाचार्य यांच्या भव्य मूर्तीचे स्टॅच्यू ऑफ इक्वॉलिटीचे (Statue Of Equality) लोकार्पण करण्यात आले. पंचधातूने बनलेली ही मूर्ती जगातील दुसरी भव्य मूर्ती आहे. या लोकार्पण सोहळ्यावेळी मोदी बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात संस्कृत श्लोकाने केली. तसेच देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छाही दिल्या.

ध्याम मूलं गुरुर मूर्ति असं आपल्याकडे म्हटलं जातं. आपल्या गुरुची मूर्तीही आपल्या ध्यानाचं केंद्र आहे. कारण गुरुच्या माध्यमातूनही आपल्यासाठी ज्ञान मिळतं. जे अबोध आहे त्याचा आपल्याला बोध होतो. अप्रकटला प्रकट करण्याची प्रेरणा आणि सुक्ष्मलाही साकार करण्याचा संकल्प हीच भारताची परंपरा राहिली आहे. युगानुयुगे मानवताला दिशा दाखवेल अशा मूल्यांचं आपण नेहमीच पालन केलं आहे. या भव्य मूर्तीद्वारे भारत मानवीय ऊर्जा आणि प्रेरणेला मूर्त स्वरुप देत आहे. ही मूर्ती

रामानुजाचार्य यांचं ज्ञान, वैराग्य आणि आदर्शांचं प्रतिक आहे. मला विश्वास आहे की ही प्रतिमा केवळ येणाऱ्या पिढीलाच प्रेरणा देणार नाही तर भारताच्या प्राचीन परंपरेला मजबूत करेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

दिव्य देशमचं इथेच दर्शन झालं

संतांनी 108 दिव्य देशमचं दर्शन भारत भ्रमण करून केलं होतं. मला इथेच हे दर्शन घेता आलं. जगातील बहुतेक सभ्यता आणि दर्शनात कोणत्याही विचाराचा स्वीकार करताना एक तर तो विचार स्वीकारला किंवा त्याचं खंडन केलं. पण भारत एकमेव देश आहे की या देशात ज्ञानाचं खंडनमंडन आणि स्वीकृती आणि विस्कृतीच्यावर पाहिलं. आपल्याकडे अद्वैत आहे आणि द्वैतही आहे. द्वैत आणि अद्वैतला समाहित करणारी रामानुजाचार्यांची शिकवण आपल्यासाठी महत्त्वाची आहे, असंही त्यांनी सांगितलं.

रामानुजाचार्यांनी कर्मावर भर दिला

जे विचार परस्पर विरोधी भाषी असतात त्यांना रामानुजाचार्य एका सूत्रात आणतात. त्यांच्या ज्ञानामुळे सामान्य माणूसही त्यांच्याशी जोडला जातो. त्यांच्या भाष्यात ज्ञानाची पराकाष्ठा आहे. दुसरीकडे ते भक्तीमार्गाचे जनक आहेत. तर दुसरीकडे समृद्ध संन्यास परंपरेचे संतही आहेत. गीतेवरील भाष्यात त्यांनी कर्माचं महत्त्व अत्यंत उत्तमरित्या अधोरेखित केलं आहे. त्यांनी स्वत:चं आयुष्य कर्मासाठी अर्पण केलं होतं. त्यांनी संस्कृत ग्रंथ लिहिले आणि तामिळ भाषेलाही भक्तीमार्गात तेवढंच महत्त्व दिलं, असं ते म्हणाले.

बाबासाहेबही म्हणायचे रामानुजाचार्यांची शिकवण अंगिकारा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक समाजसुधारक होते. तेही रामानुजाचार्यांच्या शिकवणीचे दाखले देत. रामानुजाचार्यांचे विचार आचरणात आणा. त्यांची शिकवण अंगिकारा, असं बाबासाहेब नेहमी म्हणायचे, असं मोदींनी सांगितलं. सर्वांना सामाजिक न्याय मिळाला पाहिजे. ज्यांना वर्षानुवर्ष नाकारण्यात आलं त्यांना मुख्यप्रवाहात आणलं पाहिजे. आजचा भारत या समाजााच्या उत्थानासाठी काम करत आहे. दलितांचा विकास करत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

 

संबंधित बातम्या:

Statue Of Equality: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं उद्घाटन; पवित्र मंत्रोच्चारात अतिभव्य मूर्तीचं लोकार्पण

Narendra Modi in Hyderabad LIVE : थोड्याच वेळात रामानुजाचार्य यांच्या मूर्तीचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

Statue Of Equality: ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चं आज पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, कशी आहे रामानुजाचार्यांची मूर्ती; मोदी काय म्हणाले?