Vastu Tips | पैशांचा प्रश्न? ‘उत्तर’ आहे दिशा, थोड्याशा बदलांनीही घरी लक्ष्मी नांदेल

| Updated on: Dec 23, 2021 | 9:48 AM

वास्तूनुसार काही वस्तू घरात ठेवल्याने सुख-समृद्धी येते. बर्‍याच वेळा आपण दिशा न समजता गोष्टी स्थापित करतो, ते हानिकारक असू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1 / 4
घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला - वास्तुशास्त्रानुसार घराचा दरवाजा उत्तर दिशेला असावा. या दिशेला दरवाजा असणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते. याशिवाय उत्तर दिशेला धनाची देवता कुबेरची मूर्तीही ठेवू शकता.

2 / 4
उत्तर दिशेला स्वयंपाकघर- वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघर उत्तर दिशेला असावे. असे असणे अत्यंत शुभ मानले जाते. हे केल्याने  नेहमी देवी अन्नपूर्णा आशीर्वाद देते. अन्नपूर्णा मातेच्या कृपेने अन्नाचा साठा भरून जातो आणि कधीही अन्नाची कमतरता भासत नाही.

3 / 4
उत्तर दिशेच्या भिंतींना तडे जाऊ नयेत - वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेच्या भिंतींना कधीही तडे जाऊ नयेत. त्यामुळे प्रगतीचे मार्ग बंद होतात. या गोष्टीकडे विशेष लक्ष द्या.

4 / 4
उत्तर दिशेला आरसा लावा - वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला आरसा लावणे शुभ असते. या दिशेला आरसा ठेवल्याने चांगले परिणाम मिळतात. या दिशेला आरसा लावल्याने व्यक्तीचे जीवन सुखी होते. जर तुम्हाला पैशांची चणचण असेल तर हा उपाय करून बघा.