Asia Cup 2022 : पाकिस्तानला हरवल्याचा अफगाणिस्तानला आनंद, चाहते रस्त्यावर थिरकले

| Updated on: Sep 12, 2022 | 3:48 PM

सुपर चारमधील सामन्यात ज्यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. त्यावेळी पाकिस्तानच्या नसीम खान याने सलग दोन षटकार लगावल्याने पाकिस्तानचा विजय झाला होता.

Asia Cup 2022 : पाकिस्तानला हरवल्याचा अफगाणिस्तानला आनंद, चाहते रस्त्यावर थिरकले
पाकिस्तानला हरवल्याचा अफगाणिस्तानला आनंद, चाहते रस्त्यावर थिरकले
Image Credit source: twitter
Follow us on

काल आशियाचा चषकाचा (Asia Cup 2022) अंतिम सामना झाला, त्यामध्ये श्रीलंका (Shrilanka) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यातला संघर्ष पाहायला मिळाला. श्रीलंका फलंदाजी करीत असताना अधिक धावसंख्या होईल असं सुरुवातीला वाटलं नव्हतं. परंतु पाकिस्तान खेळाडू (Player) फिल्डींग करीत असताना मोठ्या चुका केल्याने पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले.

काल विजयी झालेल्या सामन्यानंतर श्रीलंका खेळाडूंनी सुरुवातीला मैदानात डान्स केला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये तुफान डान्स केला आहे, डान्स केल्याचा खेळाडूंचा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. तसेच चाहत्यांना तो व्हिडीओ अधिक आवडला सुद्धा आहे.

सुपर चारमधील सामन्यात ज्यावेळी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना झाला. त्यावेळी पाकिस्तानच्या नसीम खान याने सलग दोन षटकार लगावल्याने पाकिस्तानचा विजय झाला होता. त्यावेळी अफगाण चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता.

काल श्रीलंका जिंकल्यानंतर अफगाण चाहत्यांनी रस्त्यावर उतरुन तुफान डान्स केला आहे. त्याचेम व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं वृत्त एका वेबसाईटने दिलं आहे. सोशल मीडियाला ते व्हिडीओ अधिक व्हायरल झाले आहेत.

आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती. मात्र त्यानंतर संघाने चांगली कामगिरी केली. पहिल्या सामन्यात भारताने त्यांचा ५ विकेट्सने पराभव केला होता. पाकिस्तानने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव केला. तर त्यानंतर भारत आणि अफगाणिस्तानचा पराभव झाला. मात्र सुपर फोरमधील सहाव्या सामन्यात त्यांना श्रीलंकेविरुद्ध ५ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर अंतिम सामन्यातही श्रीलंकेने त्याचा २३ धावांनी पराभव केला. पाकिस्तानचा कर्णधार बाबर संपूर्ण स्पर्धेत विशेष काही करू शकला नाही हे विशेष आहे.