Team India Cricket Schedule : 3 महिन्यात मोठे संघ भारतात येणार, बीसीसीआयने वेळापत्रक केले जाहीर

| Updated on: Dec 08, 2022 | 2:44 PM

भारत श्रीलंका मालिका 2023

Team India Cricket Schedule : 3 महिन्यात मोठे संघ भारतात येणार, बीसीसीआयने वेळापत्रक केले जाहीर
Team India Cricket Schedule
Follow us on

मुंबई : टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशात एकदिवसीय मालिका खेळत आहे. त्यानंतर तिथं कसोटी (test match) सामने खेळणार आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या अनुशंगाने बीसीसीआयने (BCCI) आतापासून खेळाडूंची चाचणी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये वारंवार बदल पाहायला मिळत आहे. बीसीसीआयने पुढच्या तीन महिन्याचं शेड्यूल जाहीर केलं आहे. श्रीलंका, न्यूझिलॅंड आणि ऑस्ट्रेलिया या टीम भारतात येणार आहेत.

श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यात तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. तसेच न्यूझिलंड आणि टीम इंडिया यांच्यात तीन T20 आणि तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचा दौरा मोठा असणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंडिया यांच्यात चार कसोटी सामने आणि तीन T20 सामने होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

भारत श्रीलंका मालिका 2023

पहिला T20 – 3 जानेवारी (मुंबई)
दुसरी T20 – 5 जानेवारी (पुणे)
तिसरा T20 – 7 जानेवारी (राजकोट)
पहिली वनडे – १० जानेवारी (गुवाहाटी)
दुसरी वनडे – १२ जानेवारी (कोलकाता)
तिसरी वनडे – १५ जानेवारी (तिरुवनंतपुरम)

भारत न्यूझीलंड मालिका 2023

पहिली एकदिवसीय – 18 जानेवारी (हैदराबाद)
दुसरी वनडे – 21 जानेवारी (रायपूर)
तिसरी एकदिवसीय – 24 जानेवारी (इंदौर)
पहिला T20 – 27 जानेवारी (रांची)
दुसरी T20 – 29 जानेवारी (लखनौ)
तिसरा T20 – 1 फेब्रुवारी (अहमदाबाद)

भारत ऑस्ट्रेलिया मालिका 2023

पहिली कसोटी – 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर)
दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)
तिसरी कसोटी – 1 ते 5 मार्च (धर्मशाला)
चौथी कसोटी – 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)
पहिली वनडे – 17 मार्च (मुंबई)
दुसरी एकदिवसीय – मार्च 19 (विशाखापट्टणम)
तिसरी वनडे – 22 मार्च (चेन्नई)