पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली चेस ऑलिंपियाडची टॉर्च

| Updated on: Jun 19, 2022 | 9:20 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी रविवारी 44 व्या चेस ऑलिंपियाडची (Chess olympiad) टॉर्च रिले (Torch relay) लॉन्च केली.

पंतप्रधान मोदींनी लॉन्च केली चेस ऑलिंपियाडची टॉर्च
chess olympiad
Follow us on

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांनी रविवारी 44 व्या चेस ऑलिंपियाडची (Chess olympiad) टॉर्च रिले (Torch relay) लॉन्च केली. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दिग्गज चेस खेळाडू विश्वनाथन आनंदही यावेळी उपस्थित होते. भारत संपूर्ण विश्वात बुद्धीबळाच्या खेळात आपली छाप उमटवत आहे. भारतातून चतुरंगच्या रुपातून हा खेळ संपूर्ण जगभरात पसरला. आता चेस ऑलिंपियाडची पहिली मशालही इथूनच निघतेय. इतिहासात पहिल्यांदाज असं घडतय. चेस ऑलिंपियाडच्या आधी अशा प्रकारची टॉर्च रिले निघतेय.

संपूर्ण जगात छाप उमटवतोय भारत

ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यानच टॉर्च रिलेच दृश्य दिसायचं. आता इंटरनॅशनल चेस बॉडीने चेस ऑलिंपियाडमध्ये याची सुरुवात केली आहे. भारत पहिल्यांदा या इवेंटच आयोजन करतोय. बुद्धीबळाचा खेळ आपल्या जन्मस्थानातून बाहेर निघून संपूर्ण जगात छाप उमटवतोय, याचा आम्हाला गर्व आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. भारत 44 व्या चेस ऑलिंपियाडचा यजमान आहे.

75 शहरांमधून जाणार मशाल

पंतप्रधान मोदींनी ऑलिंपियाडमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी 2020 चेस ऑलिंपियाडची सुवर्ण पदक विजेती कोनेरु हम्पी पीएम मोदींसोबत चेसही खेळली. भारत आपल्या स्वातंत्र्याची 75 वर्ष अमृत महोत्सवाच्या रुपात साजरी करत आहे.

दिल्लीमधून सुरु झालेल्या टॉर्च रिले देशातील 75 शहरांमधून जाणार आहे. ऑलिंपियाडमध्ये 188 देशातील 2 हजारपेक्षा जास्त खेळाडू सहभागी होणार आहेत. 27 जुलैला मशाल महाबलीपूरम येथे पोहोचणार आहे. त्यानंतर पुढच्याच दिवशी इथूनच स्पर्धेला सुरुवात होईल. ऑलिंपियाड 10 ऑगस्ट पर्यंत चालणार आहे.