T20 World Cup: अफगाणिस्तानच्या पराभवानंतरही राशिद खान चमकला, मलिंगाला टाकलं मागे

| Updated on: Oct 30, 2021 | 12:39 PM

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तानशी झाला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात चार षटकार ठोकत 6 चेंडू राखून विजय मिळवला.

1 / 5
आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी अफगाणिस्तानचा सामना पाकिस्तानशी झाला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानच्या आसिफ अलीने एका षटकात चार षटकार ठोकत 6 चेंडू राखून विजय मिळवला. या सामन्यात अफगाणिस्तानला विजयाच्या जवळ येऊन पराभव पत्करावा लागला. मात्र, या पराभवानंतरही त्यांच्या एका खेळाडूने एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. राशिद खान असे या खेळाडूचे नाव आहे. राशिदने अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.

2 / 5
पाकिस्तानच्या डावाच्या 15 व्या षटकात राशिदने मोहम्मद हाफिजला बाद करताच तो टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 विकेट्स पूर्ण करणारा गोलंदाज ठरला. त्याने हे काम 53 सामन्यांमध्ये केले आहे. राशिदने या सामन्यात चार षटके टाकली आणि 26 धावांत 2 बळी घेतले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम त्याचा दुसरा बळी ठरला.

3 / 5
राशिदने या बाबतीत श्रीलंकेचा महान गोलंदाज लसिथ मलिंगाला मागे टाकले आहे. मलिंगाने T-20 मध्ये 100 विकेट घेण्यासाठी 76 डाव खेळले. जर आपण त्याच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने 83 टी-20 सामन्यांत एकूण 107 विकेट घेतल्या आहेत.

4 / 5
या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी तिसऱ्या स्थानावर आहे. या उजव्या हाताच्या गोलंदाजाने 82 डावात T-20 मध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. यावेळी खेळल्या जाणार्‍या T20 विश्वचषकात टीम साऊथी देखील न्यूझीलंड संघाचा भाग आहे. त्याने आतापर्यंत 84 टी-20 सामने खेळले असून 100 विकेट्स घेतल्या आहेत.

5 / 5
साऊदीनंतर पुढचे नाव शाकिब अल हसन याचे आहे. बांगलादेशच्या या खेळाडूने 83 डावांमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये 100 विकेट्स पूर्ण केल्या आहेत. शाकिबही यावेळी टी-20 विश्वचषक खेळत असून तो सातत्याने विक्रम करत आहे. तो T20 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज देखील आहे.