Asia Cup 2022: पाकिस्तानला हरवण्यासाठी ‘हे’ 15 खेळाडू मैदानात उतरतील, जाणून घ्या संभाव्य टीम इंडिया

| Updated on: Aug 04, 2022 | 10:56 AM

Asia Cup 2022: सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये टी 20 मालिका खेळतोय. पण ही सीरीज संपल्यानंतर सर्वांच लक्ष आशिया कप स्पर्धेकडे असणार आहे. कारण आशिया कप मध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत.

Asia Cup 2022: पाकिस्तानला हरवण्यासाठी हे 15 खेळाडू मैदानात उतरतील, जाणून घ्या संभाव्य टीम इंडिया
team-india
Image Credit source: bcci
Follow us on

मुंबई: सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये टी 20 मालिका खेळतोय. पण ही सीरीज संपल्यानंतर सर्वांच लक्ष आशिया कप स्पर्धेकडे असणार आहे. कारण आशिया कप मध्ये भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. ऑगस्टच्या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच 27 ऑगस्टपासून आशिया कप स्पर्धा सुरु होत आहे. 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान परंपरागत कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना होणार आहे. या टुर्नामेंटसाठी पाकिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. आता सर्व नजरा भारतीय संघाच्या निवडीवर आहेत. वेस्ट इंडिज मध्ये सुरु असलेल्या टी 20 मालिकेत भारताने आपला मजबूत संघच उतरवला आहे. जसप्रीत बुमराह, विराट कोहली आणि युजवेंद्र चहलला या सीरीजसाठी आराम दिला आहे. केएल राहुल दुखापतग्रस्त आहे. आता आशिया कपसाठी निवड समिती कुठल्या खेळाडूंना संधी देते, त्याची उत्सुक्ता आहे. भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध आहे.

या 9 रत्नांना संधी नक्की

फलंदाजी बाबत बोलायच झाल्यास, कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत यांची निवड पक्की आहे. ऑलराऊंडर हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा सुद्धा संघाचा भाग असतील. गोलंदाजी विभागात जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारवर मुख्य जबाबदारी असेल. फिरकी गोलंदाजीच्या बाबतीत रवींद्र जाडेजाची साथ द्यायला युजवेंद्र चहल संघात आहे. विकेटकीपर/फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकची निवडही पक्की आहे.

विराट कोहलीचं काय?

आता प्रश्न त्या खेळाडूंचा आहे, जे पूर्णपणे फिट नाहीयत किंवा सध्या फॉर्म मध्ये नाहीयत. यात विराट कोहली मुख्य मुद्दा आहे. कारण तो सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. त्याला संघातून वगळण्याची मागणी होत आहे. मागच्या बऱ्याच महिन्यांपासून त्याने अपेक्षित धावा केलेल्या नाहीत. वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी त्याला आराम देण्यात आला आहे. विराट कोहली आशिया कपसाठी उपलब्ध असेल, असं सिलेक्टर्सनी सांगितलय. पण सध्याचा त्याचा फॉर्म लक्षात घेता, संघात निवड होईल का? हा मुख्य प्रश्न आहे. आगामी टी 20 वर्ल्ड कप मध्ये विराट कोहली संघाच्या रणनितीचा मुख्य भाग आहे. त्यामुळे त्याची निवड निश्चित मानली जात आहे.

संभाव्य भारतीय टीम

रोहित शर्मा (कॅप्टन), सूर्यकुमार यादव, विराट कोहली, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, श्रेयस अय्यर, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल