Video: बांगलादेश संघाने हेल्मेट ड्रामा करत श्रीलंकेची खेचली, Timed Out सेलिब्रेशनने रंगली चर्चा

| Updated on: Mar 18, 2024 | 8:03 PM

BAN vs SL: तीन सामन्यांची वनडे मालिका बांगलादेशने 2-1 ने आपल्या नावावर केली. मालिकेत श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर बांगलादेशने ब्रोकन हेल्मेट सेलिब्रेशन केलं. त्यामुळे क्रीडाविश्वात पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. टाईम आऊट सेलिब्रेशन कधीपर्यंत चालू राहणार असा प्रश्न पडला आहे.

Video: बांगलादेश संघाने हेल्मेट ड्रामा करत श्रीलंकेची खेचली, Timed Out सेलिब्रेशनने रंगली चर्चा
Video :बांगलादेशने पुन्हा एकदा सेलिब्रेशन करत श्रीलंकेला डिवचलं, Timed Out हेल्मेट ड्रामाने नवा वाद
Follow us on

मुंबई : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील क्रिकेट वॉर दिवसागणिक वाढत असल्याचं दिसत आहे. दोन्ही संघ एकमेकांना पराभूत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. पराभवानंतर दोन्ही संघांचं सेलिब्रेशनही चर्चेचा विषय ठरला आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अँजेलो मॅथ्यूजचं टाईम आऊट प्रकरणानंतर या वादाला आणखी फोडणी मिळाली आहे. टी20 मालिकेत श्रीलंकेने बांगलादेशाला चीतपट केलं आणि मालिका आपल्या नावावर केली. त्यानंतर ट्रॉफीसोबत सेलिब्रेशन करताना सर्वच खेळाडूंनी टाईम आऊट सेलिब्रेशन केलं होतं. आता टी20 मालिकेतील विजयानंतर डिवचल्यानंतर बांगलादेश पण त्याला तसंच उत्तर देणार हे क्रीडाप्रेमींना माहिती होती. वनडे मालिकेत ही संधी बांगलादेशला मिळाली. बांगलादेशने मालिके 2-1 ने जिंकली आणि लगेचच टाईम आऊट सेलिब्रेशनची परतफेड केली. ब्रोकन हेल्मेट सेलिब्रेशन करत एकप्रकारे सूड घेतला. 2023 वर्ल्डकप स्पर्धेच मॅथ्यूजचं हेल्मेट तुटलं होतं आणि टाईम आऊट झाल होता. आता बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमने नक्कल करत तसंच सेलिब्रेशन केलं.

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने कमबॅक केलं. त्यामुळे तिसरा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. श्रीलंकन संघ प्रथम फलंदाजी करताना 235 धावांवर सर्वबाद झाला.जेनिथ लियानाज व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेरी कामगिरी करू शकला नाही. जेनिथ लियानाज नाबद 101 धावांवर राहिला. बांगलादेशने श्रीलंकेने दिलेलं लक्ष्य 40.2 षटकात पूर्ण केलं. त्यानंतर मुशफिकुर रहीने हेल्मेट ब्रोकन स्टाईलने डिवचत सेलिब्रेशन केलं.

श्रीलंकने टी20 मालिकेनंतर टाईम आऊट सेलिब्रेशन केल्यानंतर बांगलादेश कर्णधार नजमुल शांतो नाराज झाला होता. “अशा पद्धतीने हँडल करणं किंवा असं काही नाही. त्यांनी टाईम आउट इशारा केला. ते टाईम आऊट प्रकरणातून पुढे जात नाहीत. मला वाटते आता ते पाठी सोडलं पाहीजे. वर्तमानात राहिलं पाहीजे. तो नियमानुसार घेतलेला निर्णय होता. त्यामुळे ते खवळले आहेत. याबाबत मी जास्त काही चिंतेत नाही.” बांगलादेश आणि श्रीलंका यांच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका 22 मार्चपासून सुरु होणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): सौम्या सरकार, अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, मेहदी हसन मिराझ, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, शरीफुल इस्लाम, मुस्तफिजुर रहमान.

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (कर्णधार/विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, जेनिथ लियानागे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, प्रमोद मदुशन, लाहिरु कुमारा.