BCCI : त्या देशानं घाबरून रहावं, संजूकडे कर्णधारपद, बीसीसीआयचा मोठा निर्णय

| Updated on: Sep 16, 2022 | 5:16 PM

संजू सॅमसनला एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. बीसीसीआयनं एक मोठा निर्णय घेत एक देशाची झोप उडवली आहे. वाचा...

BCCI : त्या देशानं घाबरून रहावं, संजूकडे कर्णधारपद, बीसीसीआयचा मोठा निर्णय
संजू सॅमसन
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : टी-20 (T20) विश्वचषकासाठी देशांचे संघ घोषित होत असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयनं (BCCI) एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एका देशाला धडकी भरली आहे. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा झाल्यापासून अनेक खेळाडूंची निवड होणार नसल्याची चर्चा आहे. विशेषत: यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसनकडे पुन्हा दुर्लक्ष झाल्याने त्याचे चाहते नाराज झाले आहेत. सॅमसनला (Sanju Samson) विश्वचषकासाठी दुसरी संधी मिळाली नसावी, पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सॅमसनवर विश्वास व्यक्त करत त्याला भारत अ संघाचा कर्णधार बनवले आहे. न्यूझीलंड अ विरुद्ध सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी सॅमसन लवकरच संघाची धुरा सांभाळणार आहे.

बीसीसीआयचं ट्विट

न्यूझीलंडविरुद्धचा भारत अ संघ जाणून घ्या… 

भारत अ: संजू सॅमसन (कर्णधार), पृथ्वी शॉ, अभिमन्यू इसवरन, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकीपर), कुलदीप यादव, शाहबाज अहमद, राहुल चहर, तिलक वर्मा, कुलदीप सेन, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक , नवदीप सैनी आणि राजनगड बावा.

सॅमसनकडे भारतीय संघाची कमान

न्यूझीलंड A चा संघ सध्या भारतात आला आहे. अलीकडेच भारत A सोबतची तीन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. मालिकेतील तीनही सामने अनिर्णित राहिले. आता दोन्ही संघ एकदिवसीय मालिकेत भिडणार असून त्यासाठी सॅमसनकडे भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली आहे. अशाप्रकारे, निवडकर्त्यांनी सॅमसनवर मोठी जबाबदारी देत ​​आगामी काळात तो या योजनेचा एक भाग असल्याचे संकेत दिले आहेत.