हरला पण जिंकलाही, असं गांगुली कुणाला म्हणालेत

| Updated on: Sep 22, 2022 | 9:31 PM

संघ गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही आणि गांगुलीनं मान्य केलंय की मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी न करणं ही चिंतेची बाब आहे. यावेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. 

हरला पण जिंकलाही, असं गांगुली कुणाला म्हणालेत
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली :  बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) आज बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नांना उत्तर दिलीत. तर रोहित शर्माच्या कामगिरीवर ते बोललेत. रोहितच्या (Rohit Sharma) कर्णधारपदावर बोलताना आणि त्याच्या कामगिरीचं कौतुक करताना गांगुली म्हणालेत की, ‘रोहित शर्माची विजयाची टक्केवारी 80च्या जवळ आहे. हे तुम्हाला महिती आहे का, टीम इंडियानं मागचे तीन-चार सामने गमावले आहेत. पण, असं असलं तरी याच संघानं 35-40 सामन्यांपैकी केवळ पाच किंवा सहा सामने गमावले आहेत. हे दुखील लक्षात घ्यायला हवे, असं म्हणत गांगुलींनी एकप्रकारे टिकाकारांनाच गप्प केलंय.

आयसीसीचं अध्यक्षपद

आयसीसीचं अध्यक्षपद आपल्या हातात नसल्याचं सांगत आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या प्रश्नांना गांगुलींनी उत्तर दिलंय. जुलैमध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं नोव्हेंबरमध्ये पुढील अध्यक्षांच्या निवडीला मान्यता दिलीय. बर्मिंगहॅममधील बैठकीनंतर ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ या वर्षी संपल्यानंतर साध्या बहुमतानं निवडणुका होतील.

पुढील अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2024 असा असेल, असा निर्णय घेण्यात आला, अशीही माहिती त्यांनी दिली.

गांगुलीच्या नावावर चर्चा

आयसीसीच्या या निर्णयापासून सौरव गांगुलीच्या नावावर चर्चा सुरू आहे. गांगुली याविषयी म्हणाले की, आयसीसी अध्यक्षपद माझ्या हातात नाही. नव्या नियमानुसार उमेदवाराला 51 टक्के मतांची आवश्यकता आहे. भारतीय संघ गेल्या काही काळापासून फॉर्ममध्ये नाही आणि गांगुलीनं मान्य केलंय की मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी न करणे ही चिंतेची बाब आहे.

विराटवरही गांगुली बोललेत

विराटवर देखील गांगुली यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, ‘आशिया कपमध्ये विराट चांगला खेळला. आशा आहे की तो ही गती कायम ठेवेल.