सूर्या-कोहलीनं धू धू धुतलं, भारतानं सीरिज जिंकली

| Updated on: Sep 25, 2022 | 11:26 PM

Ind vs Aus : मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादमधील सामन्यातील विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातलीय.

सूर्या-कोहलीनं धू धू धुतलं, भारतानं सीरिज जिंकली
सूर्या-कोहलीनं धू धू धुतलं
Follow us on

नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलियाच्या टी-20 सीरिजच्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात (Ind vs Aus 3rd T20I) टीम इडियानं (Team India) सहा विकेट राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादवची आतषबाजी आणि विराट कोहलीची (Virat Kohli) थेट खेळीनं महत्त्वाची भूमिका बजावली. विश्वचषकापूर्वीचा हा जबरदस्त सामना क्रिकेटप्रेमींना पहायला मिळाला आणि टीम इंडियाचं चहुकडे कौतुक होऊ लागलं. मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियानं शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स राखून पराभव केला. हैदराबादमधील या सामन्यातील विजयासह भारतानं मालिका 2-1 अशी खिशात घातलीय.

बीसीसीआयचं ट्विट

सूर्या-कोहली जोमात

विराट कोहलीनं आक्रमक फटके करत धावांचा वेग वाढवला. सूर्यकुमार यादवनंही  आक्रमणाची जबाबदारी स्वीकारली आणि प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजाला मैदानाच्या प्रत्येक भागात चौकार आणि षटकार मारुन दम भरला. अ‍ॅडम झम्पाला मिडविकेटच्या बाहेर आणि लाँग ऑफच्या बाहेर सलग दोन षटकार ठोकून सूर्यानं केवळ 29 चेंडूंमध्ये स्फोटक अर्धशतक पूर्ण केलंय.

हा व्हिडीओ पाहा

सूर्याची विकेट

14व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हेजलवुडनं सूर्याची विकेट घेत भारताला धक्का दिला. धावांचा वेगही कमी होऊन दबावही वाढू लागला. कोहलीनं 37 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. 11 धावांची गरज होती. कोहलीनं पहिल्या चेंडूवर षटकार मारला, पण पुढच्या चेंडूवर तो बाद झाला

राहुल-रोहित शांत

केएल राहुल पहिल्याच षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतला. तर कर्णधार रोहित शर्मा 2 चौकार आणि 1 षटकार खेचून पॅट कमिन्सचा बळी ठरला. भारताची सुरुवात फारशी वेगवान किंवा चांगलीही नव्हती.

अक्षर पटेल जोमात

अक्षर पटेलनं मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांप्रमाणेच आपल्या वेगवान गोलंदाजीनं पुन्हा ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत आणलं. यामुळेच वेगवान सुरुवात करूनही ऑस्ट्रेलियन संघ 17 षटकांत केवळ 140 धावा करू शकला.