IND vs ENG : कसोटी गमवल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं नेमकी कुठे गडबड झाली?

| Updated on: Feb 28, 2024 | 3:49 PM

भारत इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. पाचवा सामना होण्यापूर्वीच टीम इंडियाने ही मालिका खिशात घातली आहे. मालिकेत 3-1 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता पाचवा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडचे प्रयत्न असतील. असं असताना आतापर्यंत झालेल्या सामन्यात कुठे काय चुकलं याचा पाढा इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वाचला.

IND vs ENG : कसोटी गमवल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने वाचला चुकांचा पाढा, सांगितलं नेमकी कुठे गडबड झाली?
IND vs ENG : कसोटी मालिका गमवल्यानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराने असं खापर फोडलं, चुकलं काय ते सांगून टाकलं
Follow us on

मुंबई : चौथा कसोटी सामन्यांवर तसं पाहिलं तर इंग्लंडचं वर्चस्व होतं. पहिल्या डावात इंग्लंडकडे आघाडी होती. मात्र असं असूनही दुसऱ्या डावात माती खाल्ली आणि सामना हातून गमावला. दुसऱ्या डावात 46 धावांची आघाडी होती. त्यात आणखी 152 धावांची भर पडली आणि 192 धावांचं दिलं गेलं. पण हे आव्हान रोखणं इंग्लंडच्या गोलंदाजांना काही जमलं नाही. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात फिरकीपटूंना मदत करणाऱ्या पिचवर विकेट घेण्यात अपयश आलं. तसेच विना विकेट 40 धावा दिल्या. जो रुट आणि टॉम हार्टले यांना लय मिळवण्यास चांगलाच संघर्ष करावा लागला. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांना पुढ्यात चेंडू टाकल्यानंतर त्यांनी फायदा घेतला. आता इंग्लंडचा माजी कर्णधार ज्योफ्री बायकॉट यांनी द टेलिग्राफमधील कॉलममध्ये लिहिलं आहे की, ‘मला स्टोक्सचं कर्णधारपद आवडं. पण मला वाटतं की त्याने दोन स्पिनर्स जो रुट आणि टॉम हार्टलेचा सुरुवातील वापर करून चूक केली. स्टोक्सला वाटलं की नवीन हार्ड बॉल चांगल्या प्रकारे उसळी घेईल. तसेच उसळी घेत स्पिनला मदत करेल.’

“नव्या चेंडूने फिरकी टाकण्याचा अनुभव आपल्या जवळ नाही. त्यामुळे चेंडू बोटातून निसटतो. त्यामुळे योग्य ठिकाणी टप्पा टाकणं कठीण होतं. जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा फिरकीपटूंना चेंडू हातात बसावा यासाठी मातीचे हाथ लावू शकत होतो. पण त्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यामुळे त्यावर कंट्रोल करणं कठीण होतं. त्यामुळे बेन स्टोक्सने याबाबतीत जरा जास्तच विचार केला होता.”, असं ज्योफ्री बायकॉट याने सांगितलं.

जेम्स अँडरसनचा वापरही योग्य पद्धतीने करता आला नाही. नव्या चेंडूसह कमी धावा दिल्या आहेत. तसेच कर्णधार रोहित शर्माला पहिल्या डावात अडचणीत आणलं होतं. “अनुभवी गोलंदाजांना भले विकेट मिळत नसेल. पण धावा कमी देण्याचा सक्षम असतात. त्यामुळे नक्कीच इंग्लंड संघाला फायदा झाला असता.”, असंही ज्योफ्री बायकॉट याने सांगितलं.