20-20 साठी भारत-ऑस्ट्रेलियाचा संघ नागपुरात दाखल, इतक्या पोलिसांची सुरक्षा व्यवस्था

| Updated on: Sep 21, 2022 | 7:02 PM

नागपुरात होऊ घातलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. 500 अधिकारी आणि जवळपास 2 हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा तैनात राहणार आहेत.

20-20 साठी भारत-ऑस्ट्रेलियाचा संघ नागपुरात दाखल, इतक्या पोलिसांची सुरक्षा व्यवस्था
20-20 साठी भारत-ऑस्ट्रेलियाचा संघ नागपुरात दाखल
Image Credit source: Wiki
Follow us on

सुनील ढगे, नागपूर : नागपुरात होणाऱ्या भारत ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी सामन्यासाठी भारत (Indian Cricket Team) आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ आज नागपुरात दाखल झाले. 23 सप्टेंबरला नागपुरात होणारा हा सामना अतिशय रंजक आणि महत्त्वाचा समजला जातो. भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम नागपूर विमानतळावर पोहोचल्या. दोन्ही टीमला बघण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे पोलिसांनी कडक (Police Security) असा बंदोबस्त विमानतळ परिसरात लावला होता. शुक्रवारी होणाऱ्या सामन्याची उत्सुकता नागपूरकरांना लागली आहे. यासाठी 40 हजार तिकीट हातोहात विकल्या गेल्या आहेत.

नागपूरकरांमध्ये या सामन्याची उत्सुकता मोठी आहे. सोबतच गेल्या काही वर्षानंतर नागपुरात हा सामना होत आहे. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

नागपुरात होऊ घातलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्याच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी जोरदार कंबर कसली आहे. 500 अधिकारी आणि जवळपास 2 हजार पोलीस कर्मचारी सुरक्षा तैनात राहणार आहेत.

वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊ नये आणि ट्राफिक जामचा सामना करावा लागू नये यासाठी ग्रीन कॉरिडोर बनविण्यात येणार आहे. हा कॉरिडोर विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानापासून तर रहाटे कॉलनी चौकापर्यंत राहणार आहे.

40 हजार प्रेक्षक बसू शकतील एवढी स्टेडियमची कॅपॅसिटी आहे. तिकीट विक्री एकाच दिवशी झाली आहे. नागपुरात हा सामना विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या नवीन मैदानात होणार आहे. हे मैदान शहरापासून जवळपास 20 किलोमीटर अंतरावर आहे.

हायवे असल्याने वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे स्वतःच्या वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनाचा वापर प्रेक्षकांनी करावा, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. नागपुरात पावसाचं वातावरण आहे. रिमझिम स्वरूपात पाऊस पडत आहे. पार्किंगची व्यवस्थासुद्धा लांब राहणार आहे.

प्रशासनाकडून बसच्या फेऱ्या मॅचच्या दिवशी या मार्गावर वाढवण्यात आल्यात. मेट्रोसुद्धा आपल्या फेऱ्या वाढविणार आहे. प्रेक्षकांनी याचा उपयोग करावा. यामुळं वाहतूक व्यवस्था कोलमडणार नाही.

भारत आणि ऑस्ट्रेलिया टीमच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष पोलीस व्यवस्था करण्यात आली. दोन्ही टीमसोबत क्यूआर्टी टीम तैनात राहणार आहे. प्रेक्षकांना कुठलीही अडचण पडू नये किंवा सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी तयार असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं.