IND vs ENG | फक्त 120 धावा अन् टीम इंडियाचा 22 वर्षाचा खेळाडू मोडणार 53 वर्षांचा जुना रेकॉर्ड, कोहली-गावसकर पडणार पिछाडीवर?

IND vs ENG 5th Test : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाचव्या कसोटी सामन्यामध्ये मोठा विक्रम मोडला जाण्याची शक्यता आहे. हा विक्रम मोडण्याची संधी टीम इंडियाच्या 22 वर्षांच्या खेळाडूकडे असणार आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

IND vs ENG | फक्त 120 धावा अन् टीम इंडियाचा 22 वर्षाचा खेळाडू मोडणार 53 वर्षांचा जुना रेकॉर्ड, कोहली-गावसकर पडणार पिछाडीवर?
| Updated on: Feb 28, 2024 | 3:50 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने 3-1 ने मालिका खिशात घातली आहे. या मालिकेचा शेवटचा सामनाही जिंकण्याच्या मनसुब्याने टीम इंडिया मैदानात उतरताना दिसणार आहे. संपूर्ण मालिकेध्ये टीम इंडियाच्या यशस्वी जयस्वाल याने इंग्लिश गोलंदाजांचा धुराळा उडवून टाकला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी युवा खेळाडूकडे शेवटच्या सामन्यामध्ये मोठा इतिहास रचण्याची संधी आहे. 53 वर्षांआधीचा एक असा रेकॉर्ड जो यशस्वी मोडणार आहे. मात्र यासाठी त्याला शेवटच्या सामन्यामध्ये 120 धावांची गरज आहे.

कोणता आहे तो रेकॉर्ड?

यशस्वी जयस्वाल याची इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतील आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर एकदम झकास राहिली आहे. टीम इंडियाकडून या मालिकेमध्ये सर्वाधिक धावा यशस्वीच्या बॅटमधून निघाल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या 4 कसोटी सामन्यामध्ये जयस्वालने 655 धावा केल्या आहेत. आता शेवटच्या सामन्यामध्ये त्याने 120 धावा आणखी जोडल्या तर मोठा रेकॉर्ड मोडला जाणार आहे. एका मालिकेमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो पहिला खेळाडू होणार आहे.

सुनील गावसकर आणि विराट कोहली यांच्या नावावर हे रेकॉर्ड आहेत. सुनील गावसकर यांनी दोनवेळा ही कामगिरी केली आहे. 1970/71 वेस्ट इंडिज मालिकेत 4 सामन्यात 774 धावा केल्या होत्या. त्यानंतर 1978/79 वेस्ट इंडिज मालिकेत 4 सामने खेळताना 732 धावा तर तिसऱ्य क्रमांकावर विराट कोहली असून त्याने 2014/15 ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत 692 धावा केल्या होत्या.

दरम्यान, यशस्वी जयस्वाल याने चार कसोटी सामन्यात 8 डावांमध्ये दोन अर्धशतके आणि दोन द्विशतके झळकवली आहेत. विशाखापटनमधील कसोटी सामन्यात पहिल्या डावात 209 धावा केल्या होत्या. तर त्यानंतर राजकोटमधील कसोटीमध्ये दुसऱ्या डावात नाबाद 214 धावांची खेळी केली होती. या मालिकेमध्ये जयस्वाल याने सर्वाधिक 23 सिक्सर मारले असून एका मालिकेत सर्वात जास्त सिक्स मारण्याचा विक्रमही त्याने आपल्या नावावर केला आहे.