Team India : 10 महिने, 20 सामने-6 मालिका, टीम इंडियाच्या वनडे सीरिजचं वेळापत्रक जाहीर

Indian Cricket Team : शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडिया 10 महिन्यांमध्ये एकूण 6 संघांविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. टीम इंडियासमोर कोणत्या 6 संघांचं आव्हान असणार? जाणून घ्या.

Team India : 10 महिने, 20 सामने-6 मालिका, टीम इंडियाच्या वनडे सीरिजचं वेळापत्रक जाहीर
Virat Kohli and Rohit Sharma Team India
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 26, 2026 | 11:16 PM

आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व तयारी झाली आहे. मोसमातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध भिडणार आहे. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआयने टीम इंडियाचं मायदेशातील मालिकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. त्यामुळे टीम इंडिया एकूण किती एकदिवसीय मालिका खेळणार? हे स्पष्ट झालं आहे.

10 महिने आणि 20 एकदिवसीय सामने

टम इंडियाने मायदेशात शुबमन गिल याच्या नेतृत्वात 10 महिन्यांमध्ये एकूण 6 संघाविरुद्ध 6 एकदिवसीय मालिकांमध्ये 20 सामने खेळणार आहे. या एकदिवसीय मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अनुभवी फलंदाज खेळताना दिसणार आहेत. येत्या नववर्षात 2027 साली एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर टीम इंडिया अधिकआधिक एकदिवसीय सामने खेळून वनडे वर्ल्ड कपची तयारी करणार आहे. या निमित्ताने टीम इंडिया कोणत्या संघाविरुद्ध किती सामने खेळणार हे जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध अफगाणिस्तान

आयपीएल 2026 नंतर टीम इंडिया मायदेशात अफगाणिस्तानत विरुद्ध जून महिन्यात टी 20i मालिका खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

अफगाणिस्तान विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 14 जून, धर्मशाला

दुसरा सामना, 17 जून, लखनौ

तिसरा सामना, 20 जून, चेन्नई

भारताचा इंग्लंड दौरा

टीम इंडिया अफगाणिस्ताननंतर इंग्लंड विरुद्ध वनडे सीरिज खेळणार आहे. टीम इंडिया या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहेत.

पहिला सामना, 14 जुलै, बर्मिंघम

दुसरा सामना, 16 जुलै, कार्डीफ

तिसरा सामना, 19 जुलै, लॉर्ड्स

विंडीजचा भारत दौरा

वेस्ट इंडिज भारत दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

पहिला सामना, 27 सप्टेंबर, तिरुवनंतरपुरम

दुसरा सामना, 30 सप्टेंबर, गुवाहाटी

तिसरा आणि अंतिम सामना, 3 ऑक्टोबर, न्यू चंडीगड

टीम इंडियाची नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका नियोजित आहे. या मालिकेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं नाही.

श्रीलंकेचा भारत दौरा

श्रीलंका भारत दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे.

पहिला सामना, 13 डिसेंबर, दिल्ली

दुसरा सामना, 16 डिसेंबर, बंगळुरु

तिसरा सामना, 19 डिसेंबर, अहमदाबाद

विरुद्ध झिंबाब्वे

टीम इंडिया झिंबाब्वे विरुद्ध मायदेशात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. दोन्ही संघ याआधी नुकत्याच झालेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत आमनेसामने आले होते.

पहिला सामना, 3 जानेवारी, कोलकाता

दुसरा सामना, 6 जानेवारी, तिरुवनंतपुरम

तिसरा सामना, 9 जानेवारी, मुंबई

Follow Us