इंग्लंडमध्ये भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत, विकेट्सचा धडाका लावणार गोलंदाज बाहेर

| Updated on: Sep 16, 2022 | 6:28 PM

T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचे वेगवेगळे खेळाडू दुखापतीने हैराण आहेत. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल आणि रवींद्र जाडेजाच्या दुखापतीने टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या.

इंग्लंडमध्ये भारताच्या स्टार खेळाडूला दुखापत, विकेट्सचा धडाका लावणार गोलंदाज बाहेर
Team india
Image Credit source: BCCI
Follow us on

मुंबई: T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाचे वेगवेगळे खेळाडू दुखापतीने हैराण आहेत. स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल आणि रवींद्र जाडेजाच्या दुखापतीने टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या. बुमराह आणि हर्षल पटेल फिट झालेत. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन थोडं कमी झालय. पण आता आणखी एक गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.
टेस्ट टीममधील सीनियर गोलंदाज उमेश यादवला दुखापत झालीय. त्यामुळे त्याला पुन्हा काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला जाता येणार नाही.

दुखापतीमुळे बाहेर

जुलै महिन्यात उमेश यादव टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. पण त्याला संधी मिळाली नव्हती. त्याच दरम्यान त्याने इंग्लंडचा प्रसिद्ध काऊंटी क्रिकेट क्लब मिडिलसेक्ससोबत करार केला. तो मिडिलसेक्ससाठी काऊंटी चॅम्पियनशिप खेळला. त्याशिवाय रॉयल लंडन वनडे कपचे सामने खेळला. आपल्या जोरदार प्रदर्शनाने त्याने सर्वांना प्रभावित केलं. पण आता दुखापतीमुळे त्याला इंग्लंडला परतता येणार नाही.

वनडे कप दरम्यान दुखापत

मिडिलसेक्स क्रिकेट क्लबने शुक्रवारी 16 सप्टेंबरला स्टेटमेंट जारी केलं. उमेश यादव सीजनचे उर्वरित दोन सामने खेळणार नसल्याची माहिती दिली. काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये लेस्टरशर आणि वूस्टरशर विरोधात दोन सामने बाकी आहेत. उमेश यादव या दोन सामन्यांसाठी परतेल, अशी क्लबला अपेक्षा होती. पण पूर्णपणे फिट नसल्यामुळे तो दोन सामने खेळू शकणार नाही.

मेडिकल टीमच्या देखरेखीखाली उपचार

बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली त्याच्या दुखापतीवर उपचार सुरु आहेत. बीसीसीआयकडून उमेश यादव पूर्णपणे फिट नसल्याचं मिडिलसेक्सला कळवण्यात आलं. त्याला मैदानात उतरवण्याची घाई केली जाणार नाही.