IPL 2024 : एम. एस. धोनीचीही कॅप्टन्सी गेल्यावर रोहित शर्माची पोस्ट होतेय तुफान व्हायरल

| Updated on: Mar 21, 2024 | 10:44 PM

CSK New Captain : रोहित आणि धोनी कॅप्टन होते तेव्हा मुंबई आणि चेन्नईचा सामना असेल तर एक वातावरण असायचं.  दोन्ही संघांचा चाहतावर्ग मजबुत त्यामुळे हाय व्होल्टेज सामन्याची क्रीडा चाहत्यांसाठी एक पर्वणीच असायची. आता दोघेही खेळाडू म्हणून मैदानात दिसतील. रोहितने धोनीसाठी इन्स्टा स्टोरी पोस्ट केली आहे.

IPL 2024 : एम. एस. धोनीचीही कॅप्टन्सी गेल्यावर रोहित शर्माची पोस्ट होतेय तुफान व्हायरल
Follow us on

मुंबई : आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी एक दिवस बाकी असताना सीएसकेने नवीन कर्णधाराची घोषणा केली. सीएसकेच्या कर्णधारपदी ऋतुराज गायकवाड याची वर्णी लागली आहे. यंदा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांचं कर्णधारपद गेलं आहे. दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. रोहित आणि धोनी यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली संघाना पाचवेळा ट्रॉफी जिंकवून दिलीये. आयपीएल तोंडावर असताना ऋतुराजची निवड झाल्याने चाहते नाराज झाले. अशातच रोहित शर्मा यानेही एक पोस्ट केलीये जी व्हायरल होताना दिसत आहे.

रोहितने काय केलीये पोस्ट?

रोहित आणि धोनी कॅप्टन होते तेव्हा मुंबई आणि चेन्नईचा सामना असेल तर एक वातावरण असायचं.  मैदानावर खेळाडू तर चाहते एकमेकांविरोधात लढायचे. दोन्ही संघांचा चाहतावर्ग मजबुत त्यामुळे हाय व्होल्टेज सामन्याची क्रीडा चाहत्यांसाठी एक पर्वणीच असायची. दोघांनीही दर्जेदार क्रिकेट खेळलं, आता दोघेही खेळाडू म्हणून मैदानात दिसतील. रोहितने धोनीचा आणि त्याचा टॉस उडवतानाचा फोटो इन्स्टा स्टोरीला ठेवला आहे.

 

रोहित शर्माकडे मुंबईची कॅप्टनी 2013 तर धोनी सुरूवातीपासूनच सीएसकेचा कर्णधार राहिला होता. 2022 साली धोनीने कर्णधारपद सोडलं होतं, रवींद्र जडेजाकडे जबाबदारी देण्यात आली होती. मात्र संघाला यश  भेटत नसल्याने अवघ्या आठ सामन्यानंतर जडेजाने कर्णधारपद सोडलं होतं. त्यानंतर धोनीने 2023 मध्ये विजेतेपदावर नाव कोरलं होतं. रोहितच्या जागी हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी दिली गेली आहे.

दरम्यान, ऋतुराज आणि  हार्दिक दोघांनाही आता तगड्या संघाचं कर्णधारपद असणार आहे. दोघांपैकी सहाव्यांदा विजेतेपदावर कोण नाव कोरण्यात यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ऋतुराज हा 2019 पासून सीएसकेमध्ये खेळत आहे. धोनीनंतर तोच उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. धोनीचा विश्वासू आणि जवळचा असलेल्या ऋतुराजला धोनीचं मार्गदर्शन मिळणार यात काही शंका नाही.