IND vs ZIM: KL Rahul ची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड का नाही? आता पुन्हा कुठल्या दुखपतीचा त्रास?

| Updated on: Jul 31, 2022 | 11:25 AM

IND vs ZIM: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी केएल राहुलची संघात निवड होण्याची दाट शक्यता होती. पण असं झालं नाही.

IND vs ZIM: KL Rahul ची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड का नाही? आता पुन्हा कुठल्या दुखपतीचा त्रास?
KL Rahul
Follow us on

नवी दिल्ली: झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी केएल राहुलची संघात निवड होण्याची दाट शक्यता होती. पण असं झालं नाही. राहुलला पुन्हा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा त्रास होतोय, त्यामुळे त्याची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघात निवड झाली नाही, असं बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिलं. केएल राहुलची झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड निश्चित मानली जात होती. केएल राहुलनेच आता समोर येऊन स्पष्टीकरण दिलय. “केएल राहुल कोरोनामधून बरा झालाय. पण हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीने डोकं वर काढलय. झिम्बाब्वे दौऱ्यावर त्याची निवड होण्याची पूर्ण शक्यता होती. पण तो आता कधी पुनरागमन करेल, हे सांगण सध्या अवघड आहे” असं बीसीसीआयच्या सूत्राच्या हवाल्याने पीटीआयने वृत्त दिलं होतं.

पुन्हा दुखापत नाही, केएल राहुलनेच दिली अपडेट

या वृत्तानंतर केएल राहुल कधी पुनरागमन करणार? त्याची दुखापत किती गंभीर आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले. टी 20 क्रिकेट वर्ल्ड कप पर्यंत संघात तो परतेल का? हा मुख्य प्रश्न होता. आता केएल राहुलनेच त्याच्या फिटनेसवर स्पष्टीकरण दिलय.

केएल राहुलने काय म्हटलय?

“माझ्या फिटनेसबद्दल काही गोष्टी आहेत, त्या मी स्पष्ट करतो. जून महिन्यात माझी सर्जरी झाली. त्यानंतर मी सराव सुरु केला. वेस्ट इंडिज विरुद्ध पुनरागमन करेन, असा माझा विचार होता. मी पुनरागमन करणार होतो, पण इतक्यात मला कोरोनाची लागण झाली. ज्यामुळे पुन्हा दोन आठवडे मागे जावं लागलं” असं केएल राहुलने सोशल मीडियावर म्हटलय.

मला पुन्हा एकदा स्वत:ला ब्लू जर्सी मध्ये पहायचं आहे

“लवकरात लवकर फिट होण्याचा माझाा प्रयत्न आहे. जेणेकरुन निवडीसाठी मला उपलब्ध राहता येईल. आपल्या देशाच प्रतिनिधीत्व करण्यापेक्षा दुसरी कुठली मोठी गोष्ट माझ्यासाठी असू शकत नाही. मला पुन्हा एकदा स्वत:ला ब्लू जर्सी मध्ये पहायचं आहे” असं राहुलने त्याच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे.