T20 World Cup: मोहम्मद नईमने श्रीलंकेविरुद्ध केलं खास काम, शाकिबला देतोय टक्कर

बांग्लेदश विरुद्ध श्रीलंका सामन्यात बांग्लादेशचा सलामीवीर मोहम्मद नईमने उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. त्याने दमदार खेळी करत अर्धशतक केलंस आहे.

| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 6:22 PM
1 / 5
आयसीसी टी20 विश्वचषकाच्या बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका सामन्यात दोन्ही संघ उत्तम खेळ करत आहेत. बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत 171 धावा केल्या. यावेळी सलामीवीर मोहम्मद नईमने अप्रतिम फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं. यासोबतच त्याने माजी कर्णधार मोहम्मद अशरफुलच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. तर शाकिबच्या एका रेकॉर्डजवळ पोहोचला आहे.

2 / 5
नईमचं टी20 विश्व कपमधील दूसरं अर्धशतक आहे. तो यंदाच्या विश्व कपमधून बांग्लादेशकडून एक महत्त्वाची खेळी करत असून सर्वाधिक अर्धशतकं लगावली आहेत. त्याने श्रीलंकेविरुद्ध 52 चेंडूत 62 धावा केल्या आहेत.

3 / 5
या खेळीसह त्याने संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अशरफुल आणि तमीम इक्बाल यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. त्या दोघांनीही टी20 विश्वचषकात 2-2 अर्धशतकं लगावली आहेत.

4 / 5
या तिघांच्याही पुढे  बांग्लादेशचा स्टार ऑलराऊंडर शाकिब अल हसन आहे. त्याने 3 अर्धशतकं लगावली असून नईम त्याच्यापेक्षा एकच अर्धशतक मागे आहे.

5 / 5
श्रीलंकेविरुद्ध बांग्लादेशचा फलंदाज मुशफिकूरनेही नाबाद 57 धावा करत टी20 विश्वचषकात पहिलं अर्धशतक ठोकलं आहे.