IPL 2024 : मुंबई इंडियन्सने आयपीएलसाठी जारी केली नवी जर्सी, डिझाईनमध्ये फक्त एकच बदल

| Updated on: Mar 08, 2024 | 3:33 PM

आयपीएल स्पर्धा 2024 सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तत्पूर्वी संघांमध्ये बदलाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मग ते कर्णधार असो की, इतर काही बाबी..मुंबई इंडियन्समध्ये यंदाच्या वर्षात बरीच उलथापालथ पाहायला मिळत आहे. आता नव्या जर्सीची चर्चा रंगली आहे.

IPL 2024 : मुंबई इंडियन्सने आयपीएलसाठी जारी केली नवी जर्सी, डिझाईनमध्ये फक्त एकच बदल
IPL 2024 : मुंबई इंडियन्स खेळाडू उतरणार नव्या जर्सीसह, पाहा काय बदल केला ते
Follow us on

मुंबई : आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्धच वेळापत्रक जारी केलं आहे. पण निवडणुका जाहीर झाल्या की उर्वरित वेळापत्रक समोर येईल. दुसरीकडे, यंदाच्या वर्षात मुंबई इंडियन्स संघ या ना त्या कारणाने चर्चेत आला आहे. मग ते ट्रेड विंडोने हार्दिक पांड्याला घेणं असो, रोहित शर्माचं कर्णधारपद पांड्याकडे सोपवणं असो की जसप्रीत-सूर्याचे क्रिप्टिक मेसेज असो याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. आता मुंबई इंडियन्स फ्रेंचायसी आणखी एका कारणामुळे चर्चेत आली आहे. ती म्हणजे नव्या जर्सीमुळे..कर्णधार बदल्यानंतर मुंबई इंडियन्सने जर्सीही बदलली आहे. त्यामुळे नव्या जर्सीत काय बदल आहेत याची उत्सुकता लागून आहे. मुंबई इंडियन्सने नुकतीच आयपीएलसाठी नवीन जर्सी जारी केली आहे. प्रसिद्ध डिझायनर मोनिषा जयसिंग यांनी ही जर्सी डिझाईन केली आहे. जुन्या आणि नवी जर्सीत प्रथमदर्शी काही बदल वाटत नाही. पण बारकाईने पाहिल्यावर बदल लक्षात येतो.

जुन्या जर्सीप्रमाणेच नव्या जर्सीच रंग रूप आहे. निळ्या रंगाच्या जर्सीवर खांद्याच्या बाजूला सोनेरी पट्टे आहेत. त्यामुळे जर्सी तशीच तर आहे हा प्रश्न पडेल. मग नवीन काय बदल केला आहे? असा प्रतिप्रश्नही समोर येईल. फक्त एम हे अक्षर संपूर्ण जर्सीमध्ये तुम्हाला दिसून येईल. नवीन जर्सी लाँच करताना मुंबई फ्रेंचायसीचे प्रवक्ते म्हणाले’आमचे खेळाडू आमच्या संघाच्या आशा आणि स्वप्ने बाळगतात. कारण ते प्रतिष्ठित निळ्या आणि सोन्याची जर्सी परिधान करतात. खेळाडू ‘मुंबई मेरी जान’पासून प्रेरित आहे. जर्सी हा सन्मानाचा भाग आहे. जे परिधान करतात त्यांच्यासाठी अभिमानाचे प्रतीक आहे.’

हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्स पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्याच्या नेतृत्वात रोहित शर्मा फलंदाजी करताना दिसेल. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्च रोजी रविवारी गुजरात टायटन्ससोबत आहे. गेल्या दोन पर्वात हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचं नेतृत्व सांभाळलं होतं. आता त्याच संघाविरोधात मैदानात उतरणार आहे.

मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), अर्जुन तेंडुलकर, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, नेहल वढेरा, शम्स मुलानी, विष्णू विनोद, पियुष चावला, डेवाल्ड ब्रेविस, जेसन बेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय. रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, अंशुल कंबोज, नमन धीर, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.