Rahul Dravid: हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांच्या वर्षभराच्या फी चा आकाडा ऐकून डोळे विस्फारतील

Rahul Dravid: राहुल द्रविड यांच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने किती मालिका जिंकल्या? किती गमावल्या? जाणून घ्या डिटेल्स

Rahul Dravid: हेड कोच म्हणून राहुल द्रविड यांच्या वर्षभराच्या फी चा आकाडा ऐकून डोळे विस्फारतील
rohit-dravid
Image Credit source: PTI
| Updated on: Nov 11, 2022 | 6:55 PM

मुंबई: T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव होताच खेळाडूंच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतय. कॅप्टन रोहित शर्मा, केएल राहुलपासून विराट कोहली सारख्या प्लेयर्सच्या क्षमतेबद्दल शंका घेतली जातेय. या खेळाडूंनी टॅलेंटनुसार सेमीफायनलमध्ये परफॉर्मन्स केला नाही. पावरप्लेमध्ये त्यांनी पावरफुल खेळ दाखवला नाही.

टीम इंडियाचे महागडे कोच

हेड कोच राहुल द्रविड यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातय. भारताच्या पराभवानंतर त्यांच्या रणनितीवर शंका घेतली जात आहे. राहुल द्रविड हे टीम इंडियाचे महागडे कोच आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम फेल होणार, तर प्रश्न विचारलं जाणं, स्वाभाविक आहे.

तब्बल इतके कोटी फी

मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यानंतर राहुल द्रविड यांनी कोचपदाची जबाबदारी संभाळली होती. राहुल द्रविड यांच्या कोचिंगखाली टीम इंडियाचा दोन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पराभव झाला. राहुल द्रविड यांची वर्षभराची कोचिंग फी 10 कोटी रुपये आहे. त्यांची कोचिंगमध्ये टीम इंडियाच प्रदर्शन कसं आहे? ते जाणून घेऊया.

द्रविड यांच्या कोचिंगखाली कशी आहे टीम इंडियाची कामगिरी?

मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका जिंकली. दक्षिण आफ्रिकेत टेस्ट आणि वनडे सीरीज गमावली. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 आणि वनडे सीरीज जिंकली. श्रीलंकेविरुद्ध कसोटी आणि टी 20 सीरीज जिंकली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेली टी 20 सीरीज 2-2 अशी बरोबरीत सुटली.

इंग्लंडमध्ये वनडे आणि टी 20 सीरीज जिंकली. वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीज 4-1 अशी जिंकली. आशिया कपमध्ये सुपर 4 राऊंडमध्ये बाहेर. ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिका जिंकली. टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पराभव.

राहुल द्रविड यांच्या कोचिंगमध्ये काय कमतरता?
राहुल द्रविड यांच्या कोचिंगमध्ये खेळाडूंच सिलेक्शन आणि खेळाडूंच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. खेळाडूंच्या दुखापती आणि वर्कलोड मॅनेजमेंट महत्त्वाचा मुद्दा होता. गरजेपेक्षा जास्त प्रयोग झाले. पण अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही.