Dinesh Karthik: आकड्यांमध्ये पंत सरस असला तरी दिनेश कार्तिकवर तो अन्याय ठरतो, कसं ते समजून घ्या….

| Updated on: Sep 22, 2022 | 8:53 PM

ऋषभ पंतचा रेकॉर्ड चांगला पण दिनेश कार्तिकच चांगला ऑप्शन, जाणून घ्या का?

Dinesh Karthik:  आकड्यांमध्ये पंत सरस असला तरी दिनेश कार्तिकवर तो अन्याय ठरतो, कसं ते समजून घ्या....
Dinesh Karthik-Rishabh Pant
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या T20 मध्ये ऋषभ पंतला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. टीम इंडियाने विकेटकीपर फलंदाज म्हणून दिनेश कार्तिकला संधी दिली. कार्तिक पहिल्या टी 20 मध्ये फ्लॉप ठरला. पंतही फ्लॉप असल्यामुळे त्याला टीममध्ये स्थान मिळालं नव्हतं. ऋषभ पंतला आता दुसऱ्या टी20 मध्ये संधी दिली पाहिजे का? असा प्रश्न विचारला जातोय.

पंत आणि कार्तिकमध्ये कोण सरस?

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू मॅथ्यू हेडनने मी माझ्या प्रत्येक टीममध्ये ऋषभला स्थान देईन, असं म्हटलं आहे. 2022 मधील या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर नजर टाकूया. पंतने यावर्षी 16 टी 20 सामन्यात 311 धावा केल्या. त्याची सरासरी 25 पेक्षा जास्त होती. स्ट्राइक रेट 133 पेक्षा जास्त होता. त्याने एक अर्धशतक झळकावलं.

कार्तिकचे आकडे काय सांगतात?

दुसऱ्याबाजूला कार्तिकने 15 डावात 19.90 च्या सरासरीने 199 धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट 132.66 चा होता. आकड्यांमध्ये पंत पुढे आहे. आकड्यांमध्ये कार्तिक पाठीमागे दिसत असला, तरी हा त्याच्यावर अन्याय ठरेल.

कार्तिकच्या कमी सरासरीच कारणं काय?

दिनेश कार्तिकची सरासरी कमी दिसतेय. त्यामागे त्याची बॅटिंग पोजिशन कारण आहे. कार्तिक बहुतांशवेळा 15 व्या ओव्हरनंतर फलंदाजीला आला. कार्तिक मैदानावर येताच, त्याला धोकादायक फटके खेळावे लागतात. त्यात विकेट जाण्याची शक्यता जास्त असते. दुसऱ्याबाजूला पंतला ओपनिंगपासून 5 व्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची संधी मिळालीय. त्याला सेट होण्याची संधी मिळते. पण तरीही तो अपयशी ठरला. दिनेश कार्तिकची क्षमता लक्षात घेता, त्याला थोड वरती फलंदाजीची संधी मिळाली पाहिजे.