T20 WC: ‘मी आपल्याच माणसांबरोबर….’, अखेस संजू सॅमसनच दु:ख आलं बाहेर

| Updated on: Sep 17, 2022 | 4:35 PM

टी 20 वर्ल्ड कपची टीम जाहीर झाल्यानंतर एका खेळाडूच्या नावाची बरीच चर्चा झाली. ते नाव होतं संजू सॅमसन. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या टीम इंडियात संजू हवा होता, असं अनेकांच मत आहे.

T20 WC: मी आपल्याच माणसांबरोबर...., अखेस संजू सॅमसनच दु:ख आलं बाहेर
संजू सॅमसन
Image Credit source: social
Follow us on

मुंबई: टी 20 वर्ल्ड कपची टीम जाहीर झाल्यानंतर एका खेळाडूच्या नावाची बरीच चर्चा झाली. ते नाव होतं संजू सॅमसन. ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या टीम इंडियात संजू हवा होता, असं अनेकांच मत आहे. सोशल मीडियावर संजूच्या समर्थनार्थ अनेकांनी टि्वट केलं. संजूला ऋषभ पंतच्या जागी संघात स्थान मिळायला पाहिजे होतं, असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. संजूला प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्याची अनेकदा मागणी झाली आहे. या सगळ्या मुद्यांवर संजू आता व्यक्त झाला आहे.

फॅन्सचं काय म्हणणं?

संजू सॅमसनवरुन बीसीसीआयवर सातत्याने आरोप झाले आहेत. बीसीसीआयने संजूकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होतो. सिलेक्शन कमिटी पंतला जास्त संधी देतेय आणि संजूकडे दुर्लक्ष होतय असं फॅन्सच म्हणणं आहे. संजूला काही संधी मिळाल्या. त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. तो टीममध्ये सतत आत-बाहेर होत राहिला. नुकतीच त्याच्याकडे इंडिया ए ची कमान सोपवण्यात आलीय. न्यूझीलंड ए विरुद्ध तो टीम इंडियाच नेतृत्व करणार आहे.

सहकाऱ्यांबद्दल संजूच मत काय?

पंत किंवा केएल राहुलच्या जागी आपली निवड झाली पाहिजे, असं संजूला वाटत नाही. “सध्या सोशल मीडिया आणि मीडियामध्ये चर्चा आहे, संजूने प्लेइंग 11 मध्ये कोणाच्या जागी खेळलं पाहिजे? पंत की केएल राहुल. माझ स्पष्ट म्हणणं आहे, राहुल आणि पंत दोघेही माझ्या टीमसाठी खेळतात. टीममधल्या सहकाऱ्यांसोबत स्पर्धा करुन उपयोग नाही” असं संजू म्हणाला. तो वर्ल्ड क्रिकेट चॅनलवर बोलत होता.


पाच वर्षानंतर कमबॅक ही नशिबाची गोष्ट

“पाच वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक केलं. मी नशीबवान आहे. मी 15 खेळाडूंमध्ये असल्याचा आनंद घेतोय. मी पाच वर्षानंतर कमबॅक केलं. मी भाग्यवान आहे. टीम इंडियात पाच वर्षापूर्वी नंबर 1 होती. आताही आहे. टीम इंडियात 15 खेळाडूत निवड होणं, ही चांगली बाब आहे” असं संजू म्हणाला.