जेव्हा देशभर आयपीएलची सुरु धूम होती तेव्हा एका तरुण क्रिकेटरची अकाली एक्झिट, अवि बरोतचं नेमकं काय झालं?

| Updated on: Oct 16, 2021 | 1:20 PM

भारताचा युवा क्रिकेटपटू अवि बरोट याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. तो 29 वर्षांचे होता. अवि बरोत सौराष्ट्रासाठी क्रिकेट खेळायचा. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाची माहिती दिली आहे.

जेव्हा देशभर आयपीएलची सुरु धूम होती तेव्हा एका तरुण क्रिकेटरची अकाली एक्झिट, अवि बरोतचं नेमकं काय झालं?
Avi Barot
Follow us on

मुंबई : भारताचा युवा क्रिकेटपटू अवि बरोट याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. तो 29 वर्षांचे होता. अवि बरोत सौराष्ट्रासाठी क्रिकेट खेळायचा. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने त्याच्या निधनाची माहिती दिली आहे. भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचं त्याने प्रतिनिधित्व केलं आहे. कर्णधार म्हणून अवी बरोतने एक वेगळी छाप सोडली होती. रणजी स्पर्धेत सौराष्ट्रच्या विजेत्या संघाचा तो एक भाग होता. सौराष्ट्रने 2019-20 मध्ये रणजी करंडक विजेतेपद पटकावले. याशिवाय, या वर्षी जानेवारीत खेळलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेतही त्याने सौराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.

हरियाणा आणि गुजरातकडूनही क्रिकेट खेळणारा अवि बरोट आता आपल्यात राहिलेला नाही. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालंय, अशी माहिती देत अवि बरोत याच्या निधनाबद्दल सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने तीव्र शोक व्यक्त केला. अवी एक मुरलेला क्रिकेटपटू होता. त्याच्या जाण्याने सौराष्ट्र क्रिकेट संघाचं पर्यायाने भारतीय क्रिकेटचं मोठं नुकसान झालं आहे.

अवि बरोटची कारकीर्द

अवि बरोत उजव्या हाताचा यष्टीरक्षक फलंदाज होता. या व्यतिरिक्त तो ऑफ ब्रेक गोलंदाजी देखील करायचा. त्याने आपल्या कारकीर्दीत 38 प्रथम श्रेणी सामने, 38 लिस्ट ए सामने आणि 20 देशांतर्गत टी -20 सामने खेळले. त्याने प्रथम श्रेणी कारकीर्दीत 1547 धावा केल्या. लिस्ट ए सामन्यांमध्ये 1030 धावा आणि देशांतर्गत टी -20 मध्ये 717 धावा केल्या. 2019-20 च्या हंगामात जेव्हा बंगालचा पराभव करून सौराष्ट्रने रणजी करंडक विजेतेपद पटकावले, तेव्हा अवि बरोट त्या संघाचा एक भाग होता. सौराष्ट्रासाठी, त्याने 21 रणजी ट्रॉफी सामने, 17 लिस्ट ए सामने आणि 11 देशांतर्गत टी -20 सामने खेळले.

53 चेंडूत 122 धावा, टी -20 मधील धमाकेदार शतक

अवि बरोत 2011 मध्ये भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधारही होता. देशांतर्गत टी -20 मध्ये त्याच्या बॅटचा करिश्मा त्याने दाखवला होता. या वर्षी जानेवारीत खेळलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने धमाकेदार शतक केलं होतं. त्याने गोव्याविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 53 चेंडूत 122 धावा केल्या, ज्यात 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.

एससीए अध्यक्षांकडून शोक व्यक्त

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह यांनी अवि बरोत याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. “ही अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. बरोट एक चांगला खेळाडू होता, त्याच्याकडे क्रिकेटची खास कौशल्य होती. नुकत्याच खेळल्या गेलेल्या सर्व देशांतर्गत सामन्यांमध्ये बरोटची कामगिरी अप्रतिम होती. तो एक चांगला माणूस आणि खूप चांगला मित्र होता. त्यांच्या अचानक जाण्याने सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनशी संबंधित प्रत्येकाला खूप दुःख झाले आहे, असं जयदेव शाह म्हणाले.

हे ही वाचा :

MS Dhoni : बायको अन् मुलीला मिठी मारली, रैनाच्या फॅमिलीसोबत फोटोसेशन केलं, धोनीच्या विजयी सेलिब्रेशनचे खास फोटो!

IPL चं पुढचं पर्व MS धोनी खेळणार का?, जगाला पडलेल्या प्रश्नाचं धोनीने उत्तर दिलं!