IND vs AUS: T20I च्या पीचवर सर्वात खतरनाक, ऑस्ट्रेलियाचा टॉप प्लेयर 318 दिवसात फक्त एकदा झालाय OUT

| Updated on: Sep 25, 2022 | 4:00 PM

IND vs AUS: आज टीम इंडियाविरुद्ध मैदानात उतरणार, कोण आहे तो?

IND vs AUS: T20I च्या पीचवर सर्वात खतरनाक, ऑस्ट्रेलियाचा टॉप प्लेयर 318 दिवसात फक्त एकदा झालाय OUT
australia team
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई: 318 दिवस म्हणजे एक वर्ष होत नाही. पण दिवसाच्या हिशोबाने हा कालावधी कमी सुद्धा नाहीय. या इतक्यात दिवसात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एका फलंदाज आहे, जो फक्त एकदाच आऊट झालाय. म्हणजे या 318 दिवसात T20 इंटरनॅशनल पीचवर इतरवेळी हा फलंदाज नाबाद राहिलाय. तो खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहतोय. आज आणखी एक इनिंग खेळण्यासाठी हा क्रिकेटपटू हैदराबादच्या पीचवर उतरेल.

कोण आहे तो?

318 दिवसात टी 20 मॅचेसमध्ये फक्त एकदाच आऊट होणाऱ्या फलंदाजाच नाव आहे मॅथ्यू वेड. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ टीम इंडिया विरुद्ध 3 T20 सामन्यांची सीरीज खेळतोय. मॅथ्यू वेड भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमचा भाग आहे.

आज महत्त्वाची भूमिका बजावणार?

टीमच्या पहिल्या विजयात तो संघाचा भाग होता. आज हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियन टीम मैदानात उतरेल. मालिकेचा निकाल लावणारा हा सामना आहे. आज ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू वेड महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. ऑस्ट्रेलियालाही वेडकडून काही अपेक्षा आहे.

कधीपासून सुरु होतात हे 318 दिवस?

टी 20 हा क्रिकेटचा एका वेगवान फॉर्मेट आहे. या फॉर्मेटमध्ये खेळताना वेगाने धावा कराव्या लागतात. त्यावेळी विकेट टिकवून फलंदाजी करणं इतकं सोप नाहीय. पण मॅथ्यू वेडला ते जमलय. 11 नोव्हेंबर 2021 पासून मॅथ्यू वेडचे हे 318 दिवस सुरु होतात. त्यादिवशी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानमध्ये टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलचा सामना झाला होता.

वर्ल्ड कप सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयात वेडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने 17 चेंडूत नाबाद 41 धावा फटकावल्या. यात 2 चौकार आणि 4 षटकार होते.

किती धावा केल्या?

म्हणजे वेड मागच्या सेमीफायनलपासून आतापर्यंत फक्त एकदाच आऊट झालाय. या दरम्यान त्याने T20I मध्ये 8 वेळा बॅटिंग केली. 178.12 च्या स्ट्राइक रेटने त्याने 228 धावा केल्या. 7 इनिंगमध्ये तो नाबाद होता.

भारताविरुद्ध सीरीजमध्ये सर्वात जास्त धावा

मॅथ्यू वेड आज टी 20 च्या पीचवर 9 वी इनिंग खेळण्यासाठी उतरेल. आजचा सामना महत्त्वाचा आहे. कारण विजेता संघ थेट किताब जिंकेल. वेडने टीम इंडिया विरुद्ध चालू टी 20 सीरीजमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने 2 इनिंगमध्ये 88 धावा केल्यात. 45 नाबाद हा त्याचा सर्वोत्तम स्कोर आहे.