श्रीलंकेकडून संघाची घोषणा, दोन जखमी खेळाडूंनाही संधी

| Updated on: Sep 16, 2022 | 6:29 PM

T20 world cup 2022 : श्रीलंकेकडून टी-20 विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. कुणाला संधी, कुणाला डच्चू, जाणून घ्या....

श्रीलंकेकडून संघाची घोषणा, दोन जखमी खेळाडूंनाही संधी
श्रीलंकेकडून संघाची घोषणा
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : श्रीलंकेकडून (Sri Lanka) टी-20 (T20) विश्वचषकासाठी संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतासह इतर देशांनीही आपल्या क्रिकेट संघाची टी-20 विश्वचषकासाठी (T20 world cup 2022) घोषणा केली आहे. श्रीलंकेनं संघ घोषित केल्यानं यात कुणाला संधी मिळाली आणि कुणाला डच्चू मिळाला, याविषयी क्रिकेटप्रेमींमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. आशिया चषक जिंकणाऱ्या संघात श्रीलंकेच्या बोर्डानं फारसे बदल केलेले नाही. संघाचा स्टार वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीराच्या टाचेला दुखापत झाली असूनही त्याला संघात स्थान देण्यात आलंय.

आयसीसीचं ट्विट

ऑस्ट्रेलियाला रवाना होण्यापूर्वी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागेल. दुसरीकडे वेगवान गोलंदाज लाहिरू देखील पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि त्याचेही स्थान देखील त्याचा फिटनेस ठरवेल. आता आणखी संघात कोण आहे ते जाणून घ्या…

श्रीलंकेचा T20 विश्वचषक संघ

दासुन शनाका (क), दानुष्का गुनाथिलका, पथुम निसांका, कुसल मेंडिस, चरित असालंका, भानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, महेश थेक्षाना, जेफ्री वांडर्से, चमिका करुणाथनेस, चर्मिका, करुणाशमन, चर्मिका, शुक्ल माने लाहिरू कुमारा (फिटनेस), दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन

स्टँडबाय खेळाडू

अशेन बंदारा, प्रवीण जयविक्रमे, दिनेश चंडिमल, बिनुरा फर्नांडो, नुवानिडू फर्नांडो

मतिशा पाथिरानावा स्थान नाही

आशिया चषक स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या मतिशा पाथिरानाला ना मुख्य संघात स्थान मिळाले आहे ना स्टँडबाय खेळाडूंमध्ये. त्यांच्याशिवाय नुवा तुसारा आणि आशिथ फर्नांडो यांनाही संघातून वगळण्यात आलंय.

मधल्या फळीचं काय?

मधल्या फळीतील फलंदाज दिनेश चंडीमलने आशिया चषकासह टी-20 संघात पुनरागमन केले पण त्यालाही केवळ स्टँडबाय खेळाडूंमध्ये स्थान मिळाले आहे. वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंकाला आशिया चषक स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले असून त्याला संघात स्थान देण्यात आले आहे.

यूएईमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये श्रीलंकेनं शानदार खेळ दाखवला आणि चॅम्पियन बनण्यात यश मिळविलं होतं. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर तो एकही सामना खेळला नाही.

आर्थिक संकट

आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या या संघाचा पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी नामिबियाविरुद्ध होणार आहे. 18 ऑक्टोबरला ती यूएईविरुद्ध आणि त्यानंतर 20 ऑक्टोबरला नेदरलँड्सविरुद्ध खेळणार आहे.