T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपमध्ये नाही घेतलं म्हणून खवळला, केला हा रेकॉर्ड

| Updated on: Sep 25, 2022 | 4:59 PM

T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 (T-20) सीरिजमध्ये अनेक खेळाडूंना वगळण्यात आलं. ज्यांना वगळण्यात आलं त्यांनी नाराजी व्यक्त केली. तर एका खेळाडूनं थेट विक्रमच केलाय. वाचा...

T20 World Cup 2022 : वर्ल्ड कपमध्ये नाही घेतलं म्हणून खवळला, केला हा रेकॉर्ड
टीम इंडियात स्थान मिळालं नाही म्हणून दमदार कामगिरी करून कामातून दाखवून दिलं.
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : कोणतीही क्रिकेट (Cricket) मॅच असो, कुणाला संधी मिळते आणि कुणाला संधी मिळत नाही. पण, त्यावर रडत न बसता अनेक खेळाडू आपली चमक इतर क्रिकेट स्पर्धांमधून दाखवत असतात. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 (T-20) सीरिजमध्ये अनेक खेळाडूंना वगळण्यात आलं. तर अनेकांना संधीही मिळाली. पण, यावर ज्यांना वगळण्यात आलं त्यातील काही खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली. तर कुलदीप यादवनं (Kuldeep Yadav) असं काही काम केलंय. ज्यामुळे त्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

51 धावांत 4 विकेट्स

रविवारी कुलदीप यादवनं न्यूझीलंड अ संघाविरुद्ध सगळ्यांना आश्चर्य वाटावं, अशी कामगिरी केली आहे. न्यूझीलंड अ विरुद्ध चेन्नईमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात किवी संघ कुलदीपच्या फटकेबाजीला बळी पडला आणि संपूर्ण संघ 47 षटकात 219 धावांवर सर्वबाद झाला. केवळ 2 किवी फलंदाज कुलदीपचा सामना करू शकले. या सामन्यात कुलदीपनं 51 धावांत एकूण 4 विकेट्स घेत गोंधळ घातला.

हे ट्विट पाहा

47वं षटक दमदार

कुलदीपला टी-20 विश्वचषकाच्या संघात घेतलं नाही म्हणून तो नाराज होत बसला नाही. त्यानं आपली कामगिरी दाखवणं पसंत केलं. न्यूझीलंडचा संघ पूर्ण 50 षटकेही खेळू शकला नाही. कुलदीपनं 45व्या षटकातील 5व्या चेंडूवर सीन सोलियाला 28 धावांवर पाठवून आपलं खातं उघडलं.

कर्णधार संजू सॅमसननं कुलदीपला डेथ ओव्हर्स सांभाळण्याची जबाबदारी दिली. 47 व्या षटकात कुलदीप पुन्हा आक्रमणावर आला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर कुलदीपनं लोगान व्हॅन बीकला 4 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. पुढच्याच चेंडूवर जो वॉकरला आणि नंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेकब डफीला बाद करत किवींनी डाव गुंडाळला.