Rohit Sharma याला मालिका विजयानंतर सर्वात मोठा झटका, फार वाईट झालं

| Updated on: Feb 28, 2024 | 2:31 PM

Rohit Sharma Team India | रोहित शर्मा याने आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजय मिळवून दिला. रोहितचा हा कर्णधार म्हणून नववा विजय ठरला. रोहितला या विजयानंतर आयसीसीने मोठा फटका दिला आहे.

Rohit Sharma याला मालिका विजयानंतर सर्वात मोठा झटका, फार वाईट झालं
Follow us on

मुंबई | टीम इंडियाने इंग्लंड विरुद्धच झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात रांचीत चौथ्याच दिवशी सामना जिंकला. टीम इंडियाने या विजयासह रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मालिका जिंकली. टीम इंडिया या मालिकेत आता 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. टीम इंडियाचा हा भारतातील सलग 17 वा मालिका विजय ठरला. आता या मालिकेतील पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 मार्चपासून धर्मशालेत खेळवण्यात येणार आहे. कॅप्टन रोहितने इंग्लंड विरुद्ध चौथ्या कसोटीत 192 धावांचा पाठलाग करताना निर्णायक 55 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतरही कॅप्टन रोहितला मोठा फटका बसला आहे. रोहितवर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

नक्की काय झालं?

रोहित शर्माला आयसीसी टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्ये मोठा फटका बसला आहे. आयसीसीने नेहमीप्रमाणे आताही बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी कसोटी रँकिंग जाहीर केली आहे. यामध्ये कॅप्टन रोहित शर्माला तगडा फटका लागला आहे. रोहितला रँकिंगमध्ये 1 स्थानाचा तोटा झाला आहे. रोहित 720 रेटिंग्ससह 13 व्या स्थानी घसरला आहे. रोहितआधी 12 व्या क्रमांकावरुन 13 व्या स्थानी घसरला आहे. तर टॉप 10 मध्ये विराट कोहली हा टीम इंडियाचा एकमेव फलंदाज आहे. त्यातही विराटला मोठा झटका लागलाय.

विराटलाही तोटा

विराट कोहली याने कौटुंबिक कारणांमुळे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतलीय. विराटला त्याचा तगडा फटका बसला आहे. विराटला 2 स्थानांचं नुकसान झालं आहे. विराट 7 व्या क्रमांकावरुन नवव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विराटच्या नावावर ताज्या आकडेवारीनुसार 744 रेटिंग्स आहेत.

रोहित शर्माला आयसीसी रँकिंगमध्ये फटका


विराट आधी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचं बीसीसीआयने जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतर बीसीसीआयने इंग्लंड विरुद्धच्या उर्वरित 3 सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. त्यामध्ये विराट उर्वरित मालिकेतही खेळणार नसल्याचं जाहीर केलं. त्यामुळे विराटला बॅटिंग रँकिंगमध्ये हा ताटो सहन करावा लागला.

दरम्यान या आयसीसी बॅटिंग रँकिंगमध्ये केन विलियमसन याने आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथही दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. जो रुट याने पाचव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. जो रुटने टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. डॅरेल मिचेल याची तिसऱ्या वरुन चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर पाकिस्तानचा माजी कर्णधार चौथ्यावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचला आहे.