नाव मोठे दर्शन छोटे, IPL मध्ये टीमच्या मालकांना चुना लावताय हे परदेशी खेळाडू

| Updated on: Apr 17, 2024 | 6:05 PM

आयपीएल लिलावात अनेक मोठ्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी चुरस लागली होती. त्यांच्यावर टीमच्या मालकांनी पैशांचा पाऊस पाडला. पण ते खेळाडू आयपीएल २०२४ मध्ये फ्लॉप ठरताना दिसत आहेत. उलट नवीन भारतीय खेळाडू चांगली कारगिरी करताना दिसत आहेत.

नाव मोठे दर्शन छोटे, IPL मध्ये टीमच्या मालकांना चुना लावताय हे परदेशी खेळाडू
ipl 2024
Follow us on

इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये अनेक भारतीय खेळाडू अप्रतिम कामगिरी करत आहेत. मयंक यादव, शशांक सिंग, आशुतोष शर्मा या सारखे खेळाडू कमी पैशात संघमालकांनी खरेदी केलेत. पण त्यांचा खेळ शानदार आहे. दुसरीकडे, लिलावात ज्या परदेशी खेळाडूंसाठी मोठी बोली लावली ते जवळपास फ्लॉप ठरले आहेत. ग्लेन मॅक्सवेल सततच्या फ्लॉप कामगिरी करत आहे. अशी अवस्था केवळ मॅक्सवेलचीच नाही, तर करोडोंना विकल्या गेलेल्या अनेक खेळाडूंची आहे.

17.5 कोटी घेऊनही कॅमेरून ग्रीन बेंचवर

RCB ने ऑस्ट्रेलियाचा उदयोन्मुख अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन याला IPL 2024 साठी 17.5 कोटी रुपयांना खरेदी केले. आरसीबीपूर्वी ग्रीन मुंबई इंडियन्स संघात होता, परंतु नवीन संघात सामील झाल्यानंतर ग्रीनला गोलंदाजी किंवा फलंदाजी करता येत नाहीये. या हंगामात आरसीबीसाठी 5 सामन्यात ग्रीनला केवळ 68 धावा करता आल्या आहेत, तर गोलंदाजीत केवळ 2 विकेट्स घेतल्या आहेत.

11 कोटींचा ग्लेन मॅक्सवेल दबावात

T20 क्रिकेटचा स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलची IPL 2024 मध्ये कामगिरी बिघडली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी मॅक्सवेल वाईटरित्या फ्लॉप ठरला आहे. या मोसमात आतापर्यंत त्याला 6 सामन्यांत त्याने केवळ 32 धावाच केल्या आहेत. त्याची सरासरी फक्त 5.33 आहे. मॅक्सवेलला फ्रँचायझीने 11 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. अशा स्थितीत त्याच्यावर लावलेला पैसा वाया जात आहे.

अल्झारी जोसेफ देखील आपली छाप सोडू शकत नाही

RCB संघाने IPL 2024 साठी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफला 11.4 कोटी रुपयांची मोठी बोली लावून खरेदी केले होते. आरसीबीला आशा होती की अल्झारीच्या आगमनाने संघाची गोलंदाजी बळकट होईल पण तसे काही दिसले नाही. या मोसमात अल्झारीला तीन सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली ज्यात तो फक्त 1 विकेट घेऊ शकला.

सॅम कुरनही पंजाबसाठी चमत्कार करू शकला नाही

पंजाब किंग्स संघाने 2023 मध्ये सॅम कुरनला 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले होते. संघाने त्याला कायम ठेवले असले तरी 17व्या हंगामात तो काही विशेष काही कामगिरी करु शकलेला नाही. काही सामने वगळता सॅमची प्रकृती बिघडली आहे. या मोसमात आतापर्यंत सॅमला 162 धावा करताना केवळ 8 विकेट घेता आल्या आहेत.

24.75 कोटी रुपयांचा मिचेल स्टार्क

IPL 2024 मध्ये सर्वाधिक चर्चेत राहिलेला खेळाडू म्हणजे मिचेल स्टार्क. स्टार्कला केकेआरने या मोसमात २४.७५ कोटी रुपयांची विक्रमी बोली लावून विकत घेतले, पण त्याची गोलंदाजी काही प्रभावी ठरलेली दिसत नाही. स्टार्कला या मोसमात केकेआरकडून 6 सामन्यांत केवळ 5 विकेट घेता आल्या. विकेट्ससाठी तो झगडत आहे. त्यामुळे स्टार्क चांगलाच महागडा ठरला आहे.