पोलार्ड, रसेल, नरेन एकापेक्षा एक दिग्गज असून काय उपयोग? 10 वर्षात पहिल्यांदाच ओढवली अशी वेळ

| Updated on: Sep 25, 2022 | 4:49 PM

नावाने मोठे, स्टार खेळाडू पण टीमला त्यांचा काही उपयोग झाला नाही

पोलार्ड, रसेल, नरेन एकापेक्षा एक दिग्गज असून काय उपयोग? 10 वर्षात पहिल्यांदाच ओढवली अशी वेळ
pollard
Image Credit source: cpl twitter
Follow us on

मुंबई: कॅरेबियन प्रीमियर लीगच्या 10 वर्षाच्या इतिहासात असं कधी झालं नव्हतं. पण ते यावर्षी घडलं. कायरन पोलार्ड त्रिनिबागो नाइट रायडर्सच नेतृत्व करतो. त्रिनिबागो टीमला सीपीएलच्या 28 व्या मॅचमध्ये गयाना अमेजन वॉरियर्सने 37 धावांनी हरवलं. त्याचवेळी त्रिनिबागो टीमचं सीपीएलमधील आव्हान संपुष्टात आलं. सीपीएलच्या 10 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिनिबागोची टीम सेमीफायनलमध्ये पोहोचू शकली नाही.

एकापेक्षाएक सरस फलंदाज

त्रिनिबागो नाइट रायडर्सच्या टीममध्ये टी 20 क्रिकेटमधील एकापेक्षाएक सरस फलंदाज आहेत. कॅप्टन पोलार्ड त्याशिवाय या टीममध्ये आंद्रे रसेलसारख ऑलराऊंडर आहे. सुनील नरेन, टिम सायफर्ट, कॉलिन मुनरोसारखे तफानी फलंदाज या टीमचा भाग आहेत.

गुणतालिकेत ही टीम सर्वात तळाला

गयाना टीमने प्रथम बॅटिंग करताना सहा विकेट गमावून 173 धावा केल्या. त्रिनिबागो नाइट रायडर्सची टीम या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकली नाही. 20 ओव्हर्समध्ये त्रिनिबागोचा डाव 136 धावात आटोपला. गुणतालिकेत हा संघ सर्वात तळाला होता.

असे आऊट झाले फलंदाज

त्रिनिबागो टीममध्ये एकापेक्षा एक सरस खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे हे लक्ष्य त्यांच्यासाठी कठीण नव्हते. त्यांना चांगली सुरुवात मिळाली नाही. सायफर्ट 13 धावांवर शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. कॉलिन मुनरो टीमची धावसंख्या 68 असताना, पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने 30 धावा केल्या.

निकोलस पूरने 1 रन्स करुन आऊट झाला. समित पटेलला स्मिथने व्यक्तीगत 34 धावांवर आऊट केलं. पोलार्ड आणि रसेलकडून टीमला भरपूर अपेक्षा होत्या. पण हे दोन्ही फलंदाज लवकर आऊट झाले. पोलार्डने 13 आणि रसेलने 12 धावा केल्या. नरेन 19 धावांची इनिंग खेळला. गयानासाठी शाकिब अल हसनने तीन, इम्रान ताहीर आणि ज्यूनियर सिंक्लेयरने प्रत्येकी 2-2 विकेट घेतले.