IND vs SA | टीम इंडियासमोर 245 धावांचं आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?

| Updated on: Feb 06, 2024 | 5:17 PM

U19 World Cup 2024 1st Semi Final Ind vs SA | दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 245 धावांचं आव्हान ठेवलंय. आता भारतीय फलंदाजांवर सर्वस्वी जबाबदारी आहे.

IND vs SA | टीम इंडियासमोर 245 धावांचं आव्हान, कोण पोहचणार फायनलमध्ये?
Follow us on

बेनोनी | आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2024 पहिल्या सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला विजयासाठी 245 धावांचं आव्हान दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 244 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर विकेटकीपर बॅट्समन ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस याने सर्वाधिक 76 धावांची खेळी केली. तर रिचर्ड सेलेट्सवेन याने 64 रन्स केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी या स्पर्धेत पहिल्यांदा पहिल्या डावात उत्तम बॉलिंग केली. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखलं. मात्र भारतीय गोलंदाजांना विकेट्स घेता आल्या नाहीत. याचाच फायदा घेत दक्षिण आफ्रिकेने अखेरच्या 10 ओव्हरमध्ये मोठे फटके खेळून 81 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून प्रिटोरियस आणि रिचर्ड या दोघांव्यतिरिक्त इतरांना काही विशेष करता आलं नाही. मात्र काहींनी छोटेखानी उपयुक्त खेळी करत आपलं योगदान दिलं. दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन जुआन जेम्स याने 24 धावा केल्या. ट्रिस्टन लुस याने नाबाद 23 रन्स केल्या. ओलिव्हर व्हाइटहेड याने 22 धावांचं योगदान दिलं. तर स्टीव्ह स्टोल्क याने 14 धावा जोडल्या. तर इतरांना विशेष काही करता आलं नाही.

तर टीम इंडियाकडून राज लिंबांनी याने 9 ओव्हरमध्ये 60 धावा लुटवून 3 विकेट्स घेतल्या. मुशीर खान याने 10 ओव्हरमध्ये 43 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. तर नमन तिवारी आणि सौम्य पांडे या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

कोण पोहचणार फायनलमध्ये?

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, प्रियांशू मोलिया, सचिन धस, मुशीर खान, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | जुआन जेम्स (कॅप्टन), ल्हुआन-ड्रे प्रिटोरियस (विकेटकीपर), स्टीव्ह स्टोल्क, डेव्हिड टीगर, रिचर्ड सेलेट्सवेन, दिवान माराईस, ऑलिव्हर व्हाइटहेड, रिले नॉर्टन, ट्रिस्टन लुस, नकोबानी मोकोएना आणि क्वेना माफाका.