CWG 2022 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, मनप्रीत सिंह कॅप्टन, हरमनप्रीत सिंह उपकर्णधार

| Updated on: Jul 21, 2022 | 5:15 PM

भारताने कॉमनवेल्थ गेम्ससाठी सोमवारी 18 सदस्यीय सीनियर पुरुष हॉकी संघाची (Indian Hockey Team Squad) घोषणा केली.

CWG 2022 साठी भारतीय हॉकी संघाची घोषणा, मनप्रीत सिंह कॅप्टन, हरमनप्रीत सिंह उपकर्णधार
indian hockey File photo
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई: भारताने कॉमनवेल्थ गेम्ससाठी सोमवारी 18 सदस्यीय सीनियर पुरुष हॉकी संघाची (Indian Hockey Team Squad) घोषणा केली. मनप्रीत सिंहला कॅप्टन बनवण्यात आलं आहे, तर ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीत सिंह उपकर्णधार आहे. कॉम्नवेल्थ स्पर्धेसाठी (CWG 2022) दुय्यम हॉकी संघ पाठवण्यात येणार होता. पण चीनमध्ये कोविड 19 (Covid 19) मुळे आशियाई स्पर्धा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यानंतर हॉकी इंडियाने कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी मजबूत संघ निवडण्याचा निर्णय घेतला. 28 जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्स सुरु होणार आहेत. भारतीय संघ पूल बी मध्ये आहे. या गटात इंग्लंड, कॅनडा, वेल्स आणि घाना हे संघ आहेत. दोन वेळ रौप्यपदक विजेती कामगिरी करणारा भारतीय संघ 31 जुलैपासून घानाविरुद्धच्या सामन्याने आपलं अभियान सुरु करणार आहे.

पारखून संघ निवड

मागच्यावर्षी मनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारताने टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कास्यपदक विजेती कामगिरी केली होती. तो अमित रोहिदासची जागा घेणार आहे. ज्याने बेल्जियम आणि नेदरलँड विरुद्ध एफआयएच प्रो लीगमध्ये भारताचं कर्णधारपद भूषवलं. उपकर्णधार बनवण्यात आलेल्या हरमनप्रीतने एफआयएच हॉकी प्रो लीग मध्ये सर्वाधिक गोल डागले. “आम्ही कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी पारखून संघ निवडला आहे. या खेळाडूंकडे एफआयएच हॉकी प्रो लीगमध्ये दबावाच्या प्रसंगात अव्वल संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव आहे. दर चार वर्षांनी होणाऱ्या कॉमन वेल्थ स्पर्धेआधी खेळाडूंकडे अशा प्रकारचा अनुभव असणं, चांगलं आहे” असं मुख्य कोच ग्राहम रीड म्हणाले.

कोणाला स्थान मिळालं नाही?

संघात अनुभवी गोलकीपर पीआर श्रीजेश आणि दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या कृष्ण बहादुर पाठकचा समावेश करण्यात आला आहे. बचाव फळीची जबाबदारी वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह आणि जरमनप्रीत सिंह यांच्या खांद्यावर असेल. मनप्रीत, हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा हे मिडफील्ड मध्ये खेळतील. स्ट्रायकर म्हणून मनदीप सिंह, ललित कुमार उपाध्याय, गुरजंत सिंह आणि अभिषेक यांचा समावेश करण्यात आलाय. एफआयएच प्रो लीग मध्ये भारतीय संघाचा भाग असलेल्या गोलकीपर सूरज करकेरा आणि फॉरवर्ड शिलानंद लाकडा तसच सुखजीत सिंह यांना संघात स्थान मिळालेलं नाही. भारत गोल्ड कोस्ट 2018 कॉम्नवेल्थ स्पर्धेत चौथ्या स्थानावर होता.

भारतीय हॉकी संघ

गोलकीपर: पीआर श्रीजेश आणि कृष्ण बहादुर पाठक

डिफेंडर: वरुण कुमार, सुरेंद्र कुमार, हरमनप्रीत सिंह, अमित रोहिदास, जुगराज सिंह आणि जरमनप्रीत सिंह

मिडफील्डर: . मनप्रीत, (कॅप्टन) हार्दिक सिंह, विवेक सागर प्रसाद, शमशेर सिंह, आकाशदीप सिंह आणि नीलकांत शर्मा